Join us

आठवड्याच्या पहिल्या दिवशी धक्का! सेन्सेक्स २१७ अंकांनी घसरला, रिलायन्स, झोमॅटोसह 'हे' शेअर घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:02 IST

Share Market : गेल्या आठवड्यातील २ दिवसांच्या वाढीनंतर शेअर बाजार पुन्हा एकदा जोरात आपटला. आजच्या घसरणीत दिग्गज शेअरमध्ये घसरण नोंदवली.

Share Market : गेल्या आठवड्यात शेवटचे २ दिवस बाजारात तेजी आल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, हा आनंदही अल्पकालीन ठरला. सप्ताहाच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी जोरदार सुरुवात झाल्यानंतर बाजार आपली वाढ कायम ठेवू शकला नाही. बाजार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद झाले. बीएसई सेन्सेक्स २१७.४१ अंकांनी घसरला आणि ७४११५.१७ अंकांवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी ९२.२० अंकांच्या घसरणीसह २२४६०.३० अंकांवर बंद झाला. आजच्या घसरणीत दिग्गज कंपन्यांचे स्टॉक्स कोसळले.

दिग्गज शेअर्समध्ये घसरणरिलायन्स, महिंद्रा, टायटन, झोमॅटो या शेअर्समधील घसरणीमुळे बाजारात घसरण झाली. आशियाई बाजारातील मजबूत कल आणि पॉवर क्षेत्रातील शेअर्समधील खरेदीमुळे प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात हिरव्या रंगात उघडले होते.

कोणत्या सेक्टरमध्ये वाढ?सेन्सेक्स समभागांमध्ये पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि इन्फोसिसमध्ये लक्षणीय वाढ झाली. बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) शुक्रवारी २,०३५.१० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) २,३२०.३६ कोटी रुपयांचे समभाग खरेदी करून FII ला मागे टाकले. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.५१ टक्क्यांनी घसरून ७० डॉलर प्रति बॅरल होता.

बाजार का घसरतोय?राजकीय अनिश्चितता: अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्यातील टॅरिफ (आयात शुल्क) वाटाघाटीमुळे बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणांचा फटकाही जागतिक बाजारपेठांना बसत आहे. रविवारी, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिकन अर्थव्यवस्था "संक्रमणाच्या टप्प्यातून" जात आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता आणखी वाढली आहे. महागाईशी संबंधित महत्त्वाचे आकडे या आठवड्यात जाहीर केले जातील, ज्यामुळे बाजारात आणखी अस्थिरता येऊ शकते. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी