Share Market : भारतीय शेअर बाजारात मागील ७ दिवसांच्या तेजीला आज ब्रेक लागला. मार्चची मुदत संपण्यापूर्वी बुधवारी शेअर बाजारात दबाव होता. ७ दिवसांच्या वाढीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी घसरुन बंद झाले. बीएसईचे सर्व सेक्टर इंडेक्स घसरणीवर बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून आली. पीएसई, तेल आणि वायू आणि रियल्टी समभागांमध्ये विक्री दिसून आली. फार्मा, आयटी, ऊर्जा निर्देशांकही घसरणीवर बंद झाले. एकंदरीत बाजारात आलेल्या वादळाने बहुतेक सेक्टर भुईसपाट झाल्याचे पाहायला मिळालं.
बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले. बुधवारी बीएसई सेन्सेक्स ७२८.६९ अंकांनी घसरून ७७,२८८.५० अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, NSE चा निफ्टी 50 निर्देशांक देखील आज १८१.८० अंकांच्या मोठ्या तोट्यासह २३,४८६.८५ अंकांवर बंद झाला.
एनटीपीसीच्या शेअर्समध्ये भयानक घसरणबुधवारी सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ४ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. तर उर्वरित २६ कंपन्यांचे शेअर्स तोट्यात बंद झाले. दुसरीकडे, निफ्टी ५० मधील ५० कंपन्यांपैकी केवळ १० कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या चिन्हात बंद झाले आणि उर्वरित ४० कंपन्यांचे समभाग तोट्यासह लाल चिन्हात बंद झाले. आज सेन्सेक्स कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक ३.३६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक ३.४५ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
दिग्गज शेअर्समध्येही घसरणयाशिवाय आज टेक महिंद्राचे समभाग २.९७ टक्के, झोमॅटो २.५३ टक्के, ॲक्सिस बँक २.२९ टक्के, बजाज फायनान्स २.१८ टक्के, इन्फोसिस २.०७ टक्के, मारुती सुझुकी १.४४ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया १.३६ टक्के, कोटक महिंद्रा बँक १.०८ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हरचे समभाग १.०४ टक्के, एचडीएफसी बँक ०.९७ टक्के, टाटा स्टील ०.९६ टक्के, सन फार्मा ०.९३ टक्के, टीसीएस ०.७२ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.६५ टक्के, नेस्ले इंडिया ०.६५ टक्के, आयटीसी ०.६१ टक्के, एशियन पेंट्स शेअर ०.५३ टक्क्यांनी घसरले.