Join us

बाजारात गुंतवणूकदारांची निराशा! टाटाचा 'हा' शेअर सर्वाधिक आपटला; कुठे झाली वाढ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:23 IST

Share Market : चिनी कंपनी डीपसीकच्या एआय चॅटबॉटचा धुमाकूळ आजही पाहायला मिळाला. आज शेअर बाजारात तीव्र चढउतार पाहायला मिळाले. टाटाचा शेअर गुरुवारी टॉप लुजर ठरला.

Share Market : चिनी कंपनी डीपसीकने आपलं एआय मॉडेल बाजारात सादर केल्यानंतर जगभर खळबळ उडाली आहे. याचा थेट परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळाली. अमेरिकेच्या दिग्गज टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. यात भारतीय कंपन्याही होरपळल्या. गुरुवारी शेअर बाजारात प्रचंड चढउतार पाहायला मिळाले. शेअर बाजार काहीशा वाढीसह हिरव्या रंगात उघडला, आज शेअर बाजार अनेकवेळा रंग बदलताना दिसला. शेवटी वाढीसह हिरव्या रंगात बंद झाला. गुरुवारी BSE सेन्सेक्स २२६.८५ अंकांच्या वाढीसह ७६,७५९.८१ अंकांवर बंद झाला. तर NSE चा निफ्टी ५० निर्देशांक ८६.४० अंकांच्या वाढीसह २३,२४९.५० अंकांवर बंद झाला.

टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये विनाशकारी घसरणगुरुवारी, सेन्सेक्समधील ३० पैकी १८ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित १२ कंपन्यांचे समभाग घसरणी बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी ५० मधील ५० पैकी ३५ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या चिन्हात बंद झाले तर उर्वरित १५ कंपन्यांचे शेअर्स लाल चिन्हात गेले. आज सेन्सेक्स कंपन्यांमध्ये भारती एअरटेलचे शेअर सर्वाधिक २.७८ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक ७.३७ टक्क्यांच्या घसरणीसह ७०० रुपयांच्या खाली घसरले.

या कंपन्यांचे शेअर्समध्ये वाढआज सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या इतर कंपन्यांमध्ये पॉवर ग्रीड २.५९ टक्के, बजाज फायनान्स २.३६ टक्के, नेस्ले इंडिया २.१५ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर १.६३ टक्के, एशियन पेंट्स १.५७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.५३ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज १.४ टक्के, इन्डसइंड बँक १.२२ टक्के,  एचडीएफसी बँक ०.८९%, आयटीसी ०.७४%, एनटीपीसी ०.५९%, आयसीआयसीआय बँक ०.५३%, स्टेट बँक ऑफ इंडिया ०.४६%, टाटा स्टील ०.२७%, एक्सिस बँक ०.२५%, मारुती सुझुकी ०.२०% आणि टीसीएस ०.४% वाढीसह बंद झाले.

या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला दगाकाल ५ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाल्यानंतर, आज पुन्हा एकदा आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स ४.९८ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. याशिवाय बजाज फिनसर्व्ह २.१२ टक्के, अदानी पोर्ट्स १.८६ टक्के, टेक महिंद्रा १.७९ टक्के, झोमॅटो १.६६ टक्के, कोटक महिंद्रा बँक १.०१ टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.८५ टक्के, इन्फोसिस ०.५८ टक्के, अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग ०.२० टक्के, टाइटन ०.१४ टक्के आणि सन फार्मा ०.०५ टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :टाटाशेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी