Join us

61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 04:01 IST

1 रुपयांपेक्षाही कमी किमतीच्या या शेअरने बुधवारी आणि गुरुवारी अनुक्रमे 0.59 रुपये आणि 0.61 रुपये प्रती शेअरवर अप्पर सर्किटला स्पर्श केला.

शेअर बाजारातील एका मायक्रो कॅप कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या काही व्यवहारांच्या सत्रांपासून जबरदस्त तेजी दिसत आहे. दरम्यान, कंपनी पहल्यांदाच डिव्हिडेंड देण्याचा विचार करत असून, लवकरच यासंदर्भात घोषणा करू शकते. हा शेअर शरणम इंफ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंगचा (Sharanam Infraproject and Trading) आहे. हा शेअर गेल्या गुरुवारी 3% पेक्षाही अधिकने वधारून 0.61 रुपयांवर पोहोचला होता.

सातत्याने लागतंय अप्पर सर्किट -1 रुपयांपेक्षाही कमी किमतीच्या या शेअरने बुधवारी आणि गुरुवारी अनुक्रमे 0.59 रुपये आणि 0.61 रुपये प्रती शेअरवर अप्पर सर्किटला स्पर्श केला. गुरुवारी बीएसईवर शरणम इन्फ्राप्रोजेक्ट्स अँड ट्रेडिंगचा शेअर ३ टक्क्यांहून अधिकने वधारून ०.६१ रुपये प्रति शेअरवर बंद झाला होता. दरम्यान, बुधवारी कंपनीच्या संचालक मंडळाने डिव्हिडेंडसंदर्भात विचार करण्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीसंदर्भात माहिती दिली आहे. ६ मे रोजी ही बैठक होणार आहे. या बैठकीत ५० टक्क्यांपर्यंत डिव्हिडेंडची शिफारस/घोषणा करण्याचा विचार केला जाणार आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक