Join us

बापरे! १० हजारांचे केले १० कोटी, ही कंपनी जगात ठरली नंबर वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 08:38 IST

१९ वर्षांपूर्वी काेणी या कंपनीचे १० हजार रुपयांचे समभाग विकत घेतले असल्यास त्याचे मुल्य आजच्या घडीला १० काेटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

कॅलिफोर्निया : मायक्रोसॉफ्टला मागे टाकून अमेरिकेची सेमीकंडक्टर उत्पादक कंपनी एनव्हिडिया ही जगातील सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी बनली आहे. एनव्हिडियाचे बाजार भांडवल ३.३४ ट्रिलियन डॉलर (सुमारे २७८ लाख कोटी रुपये) झाले. १९ वर्षांपूर्वी काेणी या कंपनीचे १० हजार रुपयांचे समभाग विकत घेतले असल्यास त्याचे मुल्य आजच्या घडीला १० काेटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

केवळ या देशांचाच जीडीपी एनव्हिडियापेक्षा जास्त एनव्हिडियाचे बाजार भांडवल ३.३४ ट्रिलियन डाॅलर एवढे आहे. यापेक्षा जास्त जीडीपी केवळ अमेरिका, चीन, जर्मनी, जापान, भारत आणि ब्रिटनच या देशांचाच आहे. इतर सर्व देशांच्या जीडीपीवर ही कंपनी भारी आहे.

टॅग्स :अमेरिकाशेअर बाजारशेअर बाजार