Join us

रतन टाटांच्या निधनानंतर त्यांचा खास मित्र शंतनू काय करतोय? स्वतःच सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:59 IST

Shantanu Naidu : रतन टाटा आणि शंतनु नायडूची मैत्री सर्वश्रृत आहे.

Shantanu Naidu : दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शंतनु नायडू, हा टाटांच्या अखेरच्या काळात त्यांच्या सर्वात जवळ होता. रतन टाटांच्या निधनानंतर शंतनु काय करतोय ? तो टाटांच्या एखाद्या प्रोजेक्टवर काम करतोय का? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर, आता स्वतः शंतनुने लिंक्डइनवर आपल्या कामाविषयी माहिती दिली आहे. शंतनू सध्या एका प्रोजेक्टवर काम करतोय, जो आधी मुंबईत सुरू झाला होता, पण आता जयपूरला नेण्याची तयारी सुरू आहे.

शंतनू नायडूचा पॅशन प्रोजेक्ट म्हणजे 'बुकीज', जो मूक वाचन सुविधा प्रदान करतो. बुकीज हा एक वाचन समुदाय आहे, जिथे लोक सार्वजनिक ठिकाणी जमतात आणि शांतपणे वाचन करतात. आतापर्यंत त्याचा विस्तार बंगळुरू आणि पुणे येथे करण्यात आला होता, पण आता टाटांच्या मार्गदर्शनाने नायडू त्यांचे मिशन जयपूरला घेऊन जात आहेत.

8 डिसेंबर रोजी जयपूर येथे कार्यक्रम लिंक्डइनवर जयपूर लॉन्चची घोषणा करताना शंतनुने उत्साह व्यक्त केला. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "जयपूर, वेळ आली आहे. आम्ही तुम्हाला रविवारी 8 तारखेला जयपूर बुकीजमध्ये भेटू. लॉन्चसाठी खाली साइन अप करा. मी खूप उत्साहित आहे!" 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमामुळे वाचकांना मूक वाचन गटात सहभागी होण्याची आणि त्यात स्वतःची नोंदणी करण्याची संधी मिळत आहे.

या शहरांमध्येही विस्तार करण्याची योजना बुकीजने आधीच पुणे आणि बंगळुरुमध्ये याची सुरुवात केली आहे, पण भविष्यात दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि सुरतमध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहेत. दरम्यान, शंतनु आणि रतन टाटांची मैत्री खूप अनोखी होती. त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की, टाटांनी आपल्या मृत्यूपत्रात शंतनुच्या नावे एक मोठा हिस्सा ठेवला होता.

टॅग्स :रतन टाटाव्यवसाय