Stock Market Updates: देशांतर्गत शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी घसरणीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) बेंचमार्क निर्देशांक २००.६६ अंकांच्या घसरणीसह ८१,५०८.४६ च्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ५८.८ अंकांनी घसरून २४,६१९.०० च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप १०० आज ०.५१% वाढून ५९,००२ वर पोहोचला, जो सलग १७ व्या सत्रात वाढला. त्याचप्रमाणे, निफ्टी स्मॉलकॅप १०० ने १२ व्या सत्रासाठी आपली तेजी कायम ठेवली. तो ०.१९% वाढून १९,५२८ वर पोहोचला.
आजचे टॉप गेनर्स कोण?एफएमसीजी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बेंचमार्क निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात घसरले. आजच्या व्यवहारात एचडीएफसी बँक आणि आयटी पॅकने बाजाराला थोडासा आधार दिला असला तरी निर्देशांक उंचावण्यास सक्षम नव्हते. आजच्या व्यवहाराच्या सुरूवातीला, एल अँड टी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स हे निफ्टी टॉप गेनर्स राहिले, तर टाटा कंझ्युमर, एचयूएल, नेस्ले, टाटा मोटर्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये घसरण दिसून आली.
या सेक्टर्समध्ये घसरणलॉरस लॅब, डिव्हिस लॅब आणि पिरामल या फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. आजच्या व्यवहारात ऑटो आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव दिसून आला. मीडिया आणि एफएमसीजी निर्देशांकातही घसरणीचा कल दिसून आला. PSU बँक शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
या कंपनीचे शेअर्स तीन वर्षांतील सर्वोच्च पातळीवरभारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन क्लासिफाईड आणि ऑटो ऑक्शन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या कारट्रेड टेकच्या शेअर्सने सोमवारी बीएसईवर १६१८ रुपयांसह ३ वर्षांच्या उच्चांक गाठला. शेअर इंट्राडे ३ टक्क्यांनी वधारला. स्मॉलकॅप कंपनीचा शेअर सप्टेंबर २०२१ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर व्यवहार करत होता.