Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयात शुल्कात कपात अन् बाजारात बुल रन! ट्रम्प यांच्या एका निर्णयाने १३ लाख कोटींची संपत्ती वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 09:56 IST

India-US Trade Deal : अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराला अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे आज पहिल्यांदाच निफ्टी १,००० पेक्षा जास्त अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्येही जोरदार तेजी दिसून आली.

India-US Trade Deal : भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापारी करारामुळे आज भारतीय शेअर बाजाराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवरील आयात शुल्क ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा करताच गुंतवणूकदारांनी बाजारात खरेदीचा अक्षरशः पाऊस पाडला. बाजार उघडताच अवघ्या काही मिनिटांत मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १३.३७ लाख कोटी रुपयांनी वाढले असून, निफ्टीने एकाच दिवसात १००० अंकांच्या ऐतिहासिक वाढीकडे कूच केली आहे.

काय आहे ही 'महा-डील'?पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर या करारावर शिक्कामोर्तब झाले.१. टॅरिफमध्ये मोठी कपात : अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेले ५०% टॅरिफ आता केवळ १८% असेल. यामुळे भारतीय कंपन्यांची निर्यात स्वस्त होऊन नफ्यात मोठी वाढ होणार आहे.२. तेल आयातीचे नवे समीकरण : भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करून अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. या धोरणात्मक बदलामुळे जागतिक राजकारणात भारताचे वजन वाढले आहे.

बाजारातील 'सुनामी' आकडेवारी

  • सेंसेक्स : २५०८ अंकांची (३.०७%) झेप घेत ८४,१७५ च्या स्तरावर पोहोचला.
  • निफ्टी ५० : ७६५ अंकांच्या उसळीसह २५,८५३ वर व्यवहार करत आहे. निफ्टी आता ५ जानेवारी २०२६ रोजी गाठलेल्या २६,३७३ या सर्वोच्च शिखराच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
  • क्षेत्रीय निर्देशांक : निफ्टीचे सर्व सेक्टर सध्या 'ग्रीन झोन' मध्ये असून मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी सुरू आहे.

वाचा - बँकिंग क्षेत्रात 'FDI'चा धमाका! सरकारी बँकांमध्ये ४९% परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव; अर्थमंत्रालयाचे मोठे पाऊल

गुंतवणूकदार मालामाल!सोमवारी (२ फेब्रुवारी) बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४५५.०३ लाख कोटी रुपये होते. आज (३ फेब्रुवारी) बाजार उघडताच ते ४६८.४० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १३,३७,०९१ कोटी रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे 'गिफ्ट निफ्टी' २६,१५० च्या पार गेल्याने आज बाजार विक्रमी पातळीवर बंद होण्याची दाट शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Tariff Cut Triggers Market Rally, Adding Billions to Investor Wealth

Web Summary : A US-India trade deal spurred a massive market rally. Trump's tariff cut on Indian goods fueled investor buying, boosting market capitalization by ₹13.37 lakh crore, and pushing Nifty towards record highs. The deal includes reduced tariffs and revised oil import policies.
टॅग्स :स्टॉक मार्केटशेअर बाजारगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी