Join us

सेन्सेक्स, निफ्टी १०% ने वाढणार; तज्ज्ञांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 06:55 IST

येत्या सणासुदीमुळे बाजारात तेजी कायम राहील.

नागपूर : येत्या तीन महिन्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टी १० टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे, असे भाकित शेअर बाजार तज्ज्ञांनी वर्तवले आहे.गेल्या शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपनी कर, मॅट व भांडवली नफ्यावरील अधिभार कमी करताच सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक पाच टक्क्याने केवळ दोन तासात वाढले होते. आजही ही तेजी कायम राहिली. सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४५० अंकानी उसळला. दिवसअखेर सेन्सेक्स ३९०९० तर निफ्टी ११६०० वर बंद झाला. येत्या सणासुदीमुळे बाजारात तेजी कायम राहील. सेन्सेक्स-निफ्टी डिसेंबरपर्यंत १०% वाढतील असे तज्ज्ञांना वाटते.

टॅग्स :शेअर बाजार