Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्स, निफ्टीची उच्चांकी भरारी; पतधोरणाच्या पूर्वसंध्येला शेअर बाजार वधारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 06:22 IST

सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे

मुंबई : शेअर बाजारामध्ये दोन दिवस असलेली मरगळ गुरुवारी कमी झाली. पतधोरणाच्या पूर्वसंध्येला शेअर बाजार वधारला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे. मुंबई शेअर बाजारामध्ये गुरुवारी प्रारंभापासूनच उत्साह होता. दिवसभर निर्देशांक वाढत होता. बाजार बंद होताना संवेदनशील निर्देशांक ५२,२३२.४३ अशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ३८२.९५ अंशांची वाढ झाली आहे. संवेदनशील निर्देशांकाचा हा विक्रम आहे. याआधी या निर्देशांकाने १५ फेब्रुवारी रोजी ५२,१५४.१३ अंशांची विक्रमी धडक दिली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)नेही नवीन उच्चांक नोंदविला आहे. दिवसभरामध्ये हा निर्देशांक ११४.१५ अंशांनी वाढून १५,६९०.३५ अंशांवर बंद झाला. हा आतापर्यंतच्या बंद निर्देशांकाचा उच्चांक आहे. 

टॅग्स :निर्देशांकशेअर बाजार