Join us

भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:06 IST

SBI Report On US Tariffs: हा टॅरिफ अथवा कर आज (27 ऑगस्ट 2025) सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून लागू झाला आहे. मात्र असे करून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आधी 25 टक्के बेस टॅरिफ लावला. यानंतर, रशियाकडून तेल खरेदी केल्याने दंडाच्या स्वरुपात 25 टक्के, म्हणजेच एकूण 50 टक्के टॅरिफ लावला आहे. हा टॅरिफ अथवा कर आज (27 ऑगस्ट 2025) सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून लागू झाला आहे. मात्र असे करून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारतावर अधिक शुल्क लावण्याचा उलटा परिणाम अमेरिकेवरच होऊ शकतो. यामुळे त्यांची अर्थव्यवस्था रसातळाला जाऊ शकते. तसेच, यामुळे तेथील महागाई वाढेल, तर दुसरीकडे, विकासालाही मोठा धक्का बसू शकतो.

नवे टॅरिफ अमेरिकेसाठी आत्मघाती -एएनआय या वृत्तसंस्थेने एसबीआयच्या अहवालाच्या हवाल्याने म्हटले आहे की, नव्या टॅरिफमुळे अमेरिकेचा जीडीपी ग्रोथ घसरून 40-50 बेसिस प्वाइंट वर येऊ शकतो. याशिवाय, कमकुवत अमेरिकन डॉलर आणि खर्चात वाढ, यामुळे महागाईही जबरदस्त वाढेल.

अमेरिकेत, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि ग्राहकोपयोगी वस्तू यासारख्या पूर्णपणे आयातीवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांवर याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. सबीआयच्या अहवालात पुढे म्हणण्यात आले आहे की, २०२६ मध्ये यूएस फेडरल रिझर्व्हचे अंदाजे महागाई लक्ष्य २ टक्के एवढे आहे. मात्र, हा दर त्यापेक्षाही खूप अधिक असणार आहे. याचे मुख्य कारण टॅरिफचा परिणाम सांगण्यात आले आहे.

टॅग्स :टॅरिफ युद्धडोनाल्ड ट्रम्पअमेरिकाअमेरिकाभारत