Join us

SBI आणि HDFC Bank नं दिलं न्यू ईयर गिफ्ट; वाढवलं FD वरील व्याज, कोणाला फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:17 IST

Fixed Deposit Interest Rate : देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीने काही ठेवीदारांसाठी एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (एफडी) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीने काही ठेवीदारांसाठी एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयने ८० वर्षांवरील अतिज्येष्ठ नागरिकांसाठी नवी सेवा सुरू केली आहे. अशा ठेवीदारांना ज्येष्ठ नागरिकांपेक्षा १० बेसिस पॉईंट अधिक व्याज मिळणार आहे. एचडीएफसी बँकेनं बल्क डिपॉझिट (५ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त) वरील परताव्यात ५ ते १० बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09

एसबीआयनं आपल्या योजनेची पुनर्रचना केली असून ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी अधिक व्याज देण्याची घोषणा केलीये. या अंतर्गत ग्राहक आपल्या बचतीची उद्दिष्टे निश्चित करू शकतात आणि त्यानुसार रिकरिंग डिपॉझिटसाठी साइन अप करू शकतात. विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात करण्याची मागणी होत असतानाच बँकेनं व्याजदरात सुधारणा केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार डिसेंबरच्या मध्यापर्यंत बँक ठेवी आणि बँकांचे कर्ज ११.५ टक्क्यांच्या समान वेगानं वाढत होतं.

इतर बँकाही व्याज वाढवणार का?

एसबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात वाढ झाल्यानंतर इतर बँकाही हे करू शकतात. मात्र, एचडीएफसी बँकेनx व्याजदरात बदल करून इतर बँकांच्या व्याजदराच्या बरोबरीनं आल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठेवींच्या किमतीशी थेट निगडित असलेल्या कर्जाच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लोन रेटमध्ये सुधारणा केल्यामुळे ठेवींचे उच्च दर देखील कर्जाचा खर्च वाढवतात. डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीतील व्यवसायाचे आकडे जाहीर करणारी पहिली मोठी बँक बँक बँक ऑफ बडोदा आहे. त्यांच्या ग्लोबल अॅडव्हान्सेस आणि ग्लोबल डिपॉझिटमध्ये अनुक्रमे ११.७% आणि ११.८% वाढ झाली आहे.

टॅग्स :एसबीआयएचडीएफसी