नवी दिल्लीः पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सरकारची छोटी योजना मोठा फायदा मिळवून देते. जास्त करून लोक पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. तसेच या योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला दीड लाख रुपयांपर्यंत करातून सूट मिळते. तसेच योजनेत गुंतवलेल्या पैशाची मुदत संपल्यानंतर ते करमुक्त स्वरूपात आपल्याला मिळतात. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीसाठी पीपीएफवर 7.9 टक्के व्याज मिळतं.पीपीएफ खात्याची 15 वर्षांची मुदत असते. खरं तर जॉइंट पीपीएफ खातं कधीही उघडू नये. पालक आपल्या अल्पवयीन पाल्याच्या नावावर खातं खोलू शकतात. जर पालकांचं आधीच कुठे खातं असल्यास वर्षाला दोन्ही खात्यात मिळून दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलाच्या खात्यात पालकांनी पैसे टाकल्यास त्यांना कलम 80अंतर्गत प्राप्तिकरात सूट दिली जाते. पण अल्पवयीन मुलगा 18 वर्षांचा झाल्यानंतर त्याला अर्ज करून खात्यात बदल करावा लागतो. त्यानंतर तो स्वतः ते खातं चालवू शकतो. अनिवासी भारतीय PPF खातं उघडू शकत नाहीत. अनिवासी होण्यापूर्वीच जर एखाद्या विदेशी व्यक्तीनं खातं उघडलेलं असल्यास ते तो कार्यान्वित ठेवू शकतो. पीपीएफ खात्याच्या व्याजाची गणना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत होते. जर आपल्याला जास्त नफा मिळवायच असल्यास महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पैसे जमा करावेत. आपल्या पीपीएफ खात्यातून सातव्या वित्त वर्षांत काही पैसे काढता येतात, तसेच या काढलेल्या पैशांवरही कोणताही कर लावला जात नाही. 15 वर्षांनंतरही आपण पीपीएफ खातं सुरू ठेवल्यास पैसे काढता येतात. 15 वर्षांनंतर पीपीएफ खात्यात योगदान जारी ठेवायचं असल्यास आपल्याला फॉर्म एच भरावा लागणार आहे.
बँकेत रिकरिंग खातं की पीपीएफ अकाउंट?; जाणून घ्या, कुठे होईल जास्त फायदा!छोट्यांच्या खिशात हात; PPF, सुकन्या समृद्धी, NSC गुंतवणुकीवरील व्याजात कपातपोस्टाची ही योजना आहे खास, करोडपती बनवेल हमखासपोस्टातल्या छोट्या बचतीवर हमखास मोठा फायदा, दररोज 200 रुपये वाचवून कमवा 21 लाख