Join us  

पोस्टाच्या 'या' चार योजनांमध्ये पैसे ठेवल्यास मिळेल जबरदस्त फायदा !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 4:41 PM

भारतीय पोस्ट ऑफिस ही ग्राहकांना बँकिंग सुविधाही पुरवते

नवी दिल्ली- भारतीय पोस्ट ऑफिस ही ग्राहकांना बँकिंग सुविधाही पुरवते. या सुविधांतर्गत बचत खातं उघडणं, पोस्टातल्या बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आकर्षक व्याजही मिळते. हल्लीच सरकारनं छोट्या छोट्या बचत योजनांवर ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत व्याजदरात वाढ केली आहे. पोस्टाच्या सेव्हिंग योजनांमध्ये व्याजदरात 0.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. पोस्टात अशाच चार योजनांवर कमीत कमी तुम्हाला 8 टक्के व्याज मिळतंय. अशाच काही योजनांबद्दल जाणून घेऊयात..वरिष्ठ नागरिक बचत खाते(एससीएसएस): 60 वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकते. 55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात. या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमवू शकता. ज्यावर तुम्हाला वर्षाला 8.7 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते. डिसेंबर 2018च्या तिमाहीत वरिष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्हाला प्रतिवर्ष 8.7 टक्के व्याज मिळते. वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज 31 मार्च/30 सप्टेंबर/ 31 डिसेंबरला जमा करण्याच्या तारखेपासून लागू आहे. त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबरपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळणार आहे. 15 वर्षीय पब्लिक प्रॉव्हिडंट फंड(पीपीएफ): या योजनेत 100 रुपयांपासून खातं उघडू शकता. खातेधारकांना या खात्यात पूर्ण आर्थिक वर्षात 500 रुपयांपासून जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात. या खात्याची मर्यादा ही 15 वर्षांची आहे. या योजनेत संयुक्त खातंही उघडता येते. तसेच तुम्हाला या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही मिळते. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो. डिसेंबरमध्ये समाप्त होणा-या तिमाहीसाठी पीपीएफमध्ये जमा असलेल्या रकमेवर प्रतिवर्षी 8 टक्के व्याज मिळते. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(एनएससी): नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 8.0 टक्क्यांनी व्याज मिळते. या योजनेंतर्गत तुम्ही 100 रुपये गुंतवू शकता. पहिल्यांदा या योजनेत गुंतवणूक करणा-याला वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळत होते. जर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 100 रुपयांची गुंतवणूक केल्यास पाच वर्षांनी तुम्हाला 146.93 रुपये व्याजाच्या स्वरूपात मिळतात. सुकन्या समृद्धी अकाऊंट- पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सर्वाधिक व्याज मिळते. या योजनेत आर्थिक वर्षात कमीत कमी 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 150000 रुपये गुंतवू शकता. या खात्यावर 8.5 टक्के व्याज मिळते. यात लमसम पैसे गुंतवले जातात. वर्षभरात पैसे जमा करण्याची कोणतीही मर्यादा नाही. मुलीच्या नावे तुम्ही या खात्यातून खातं उघडू शकता. मुलीचा जन्म झाल्यानंतर 10 वर्षांच्या आत खातं उघडलं जातं. मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर हे खातं बंद केलं जातं.  

टॅग्स :पोस्ट ऑफिसपैसा