Join us

Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 10:14 IST

Samsung 520 Million Dollar Tax Demand: सॅमसंग कंपनीला भारतात मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. भारत सरकारनं सॅमसंगला ५२० मिलियन डॉलरचा (सुमारे ४४०० कोटी रुपये) कर भरण्याचे आदेश दिले आहेत.

Samsung 520 Million Dollar Tax Demand: सॅमसंग कंपनीला भारतात मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. भारत सरकारनं सॅमसंगला ५२० मिलियन डॉलरचा (सुमारे ४४०० कोटी रुपये) कर भरण्याचे आदेश दिले आहेत. सॅमसंग कंपनी या आदेशाविरोधात लढा देत आहे. कंपनीवर बाहेरून मागवलेल्या नेटवर्किंग उपकरणांचा चुकीचा वापर केल्याचा आरोप आहे.

सॅमसंगचे म्हणणं आहे की, भारतीय अधिकाऱ्यांना याची आधीच माहिती होती. रिलायन्स जिओनंही कर न भरता अशाच उपकरणांची ऑर्डर दिली होती, असंही कंपनीनं म्हटलं. सॅमसंगचा आरोप आहे की, रिलायन्सनं त्यांना कराबाबत आगाऊ इशाऱ्याची माहिती दिली नाही. कर आणि दंड मिळून सॅमसंगला एकूण ६०१ दशलक्ष डॉलर्स द्यावे लागू शकतात.

FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील

सॅमसंगचं अपील

सॅमसंगनं ५२ ० दशलक्ष डॉलरची कर मागणी रद्द करण्यासाठी भारतीय न्यायाधिकरणाकडे अपील केलं आहे. त्यांनी ऑर्डर केलेले डिव्हाइस चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आले होते. परंतु रिलायन्स वर्षानुवर्षे अशीच उपकरणं मागवत असल्यानं अधिकाऱ्यांना याची माहिती होती, असं सॅमसंगनं म्हटलं. भारत सरकारच्या करमागणीला आव्हान देणारी सॅमसंग ही दुसरी मोठी परदेशी कंपनी आहे. यापूर्वी फोक्सवॅगननंही सरकारवर खटला दाखल केला होता. फोक्सवॅगननेही आपल्या उपकरणांची चुकीची माहिती दिल्यानं कंपनीला १.४ बिलियन डॉलरचा कर भरण्यास सांगण्यात आलं होतं.

काय आहे प्रकरण?

सॅमसंगच्या बाबतीत कर अधिकाऱ्यांनी सॅमसंगला जानेवारीत ५२० मिलियन डॉलर्स भरण्यास सांगितलं होतं. सॅमसंगनं मोबाइल टॉवरवर एका विशिष्ट डिव्हाइसची चुकीची मांडणी करून १० ते २० टक्के कर वाचवला होता, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. सॅमसंगनं २०१८ ते २०२१ दरम्यान मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला ही डिव्हाइस विकली होती.

टॅग्स :सॅमसंगरिलायन्स जिओकर