Join us
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:07 IST

एसएम गोल्डच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹२१.८० एवढा आहे. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये ६१% वाढ झाली. त्याने बुधवारी २०.७० च्या आकड्यालाही स्पर्ष केला.

देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण दिसून येत आहे. मात्र या घसरणीच्या परिस्थितीतही, एसएम गोल्ड पेनी स्टॉक रॉकेट बनला आहे. हा शेअर बुधवारी बीएसईवर १६% हूनही अधिक वधारला आणि ₹२०.१५ वर बंद झाला. सध्या हा शेअर त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकाच्या अगदी जवळ आहेत. 

एसएम गोल्डच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹२१.८० एवढा आहे. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये ६१% वाढ झाली. त्याने बुधवारी २०.७० च्या आकड्यालाही स्पर्ष केला.

एसएम गोल्डच्या शेअरने पाच दिवसांत दिला ६१% परतावा - ज्वैलरी बिजनेसशी संबंधित एसएम गोल्ड कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसांत ६१.७२% वाढ झाली आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी कंपनीचा शेअर ₹१२.४६ वर होता. तो १४ जानेवारी २०२६ रोजी ₹२०.१५ वर बंद झाले. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सची किंमत ६१.८५% एवढी वाढली आहे. 

बुधवारी एस.एम. गोल्डच्या मार्केट कॅपने ₹२६ कोटींचा टप्पा ओलांडला. महत्वाचे म्हणजे, कंपनीत प्रमोटर्सचा वाटा ३३.९१% एवढा आहे. तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग ६६.०९% एवढी आहे.

५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ८५% वधारला शेअर - एस.एम. गोल्डचा शेअर त्यांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ८५% वधारला आहे. २२ डिसेंबर २०२५ रोजी एस.एम. गोल्डचा शेअर ₹१०.९० वर होते. तो १४ जानेवारी २०२६ रोजी ₹२०.१५ वर पोहोचला. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

 

English
हिंदी सारांश
Web Title : SM Gold Penny Stock Rockets, Surges 61% in 5 Days!

Web Summary : SM Gold penny stock soared 61% in five days, closing at ₹20.15. The jewellery business-related stock has seen an impressive rise from its 52-week low, reaching near its 52-week high, showcasing significant growth.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकव्यवसाय