Iran Israel America War: काही दिवसांपूर्वी रशियन तेलाला कोणीही खरेदीदार मिळत नव्हता आणि रशिया प्रति बॅरल ५० डॉलरपेक्षा कमी दराने तेल विकण्यास तयार होता. मात्र, काळ बदलला असून आता रशियन तेलाची मागणी पुन्हा वाढली आहे. रशियन तेलाचा दर आता प्रति बॅरल ७० डॉलरच्या पार गेलाय. रशिया अजूनही भारताला सवलतीच्या दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करत असला, तरी सध्याच्या जागतिक स्थितीमुळे रशियाचा मोठा फायदा होत आहे.
मध्य पूर्वेतील तणावाचा रशियाला फायदा
इराणवर इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेमध्ये निर्माण झालेला तणाव रशियासाठी फायदेशीर ठरला आहे. या युद्धामुळे आखाती देशांतून पूर्व आशियाला होणारा तेल पुरवठा विस्कळीत झालाय. अशा परिस्थितीत भारत आणि इतर अनेक आशियाई देश रशियन तेलावर अवलंबून आहेत. पूर्व आशियाकडे जाणारे रशियाचे तेलाचे टँकर आता दिशा बदलून आशियाई देशांकडे वळू लागलेत. विशेषतः पूर्व आशियाकडे जाणारे रशियाचे दोन मोठे टँकर आता भारताच्या दिशेने वळलेत.
हॉर्मुजची सामुद्रधुनी बंद होण्याची भीती
इराण युद्धामुळे हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारा तेल पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार, मूळचे पूर्व आशियाकडे जाणारे दोन रशियन टँकर आता भारतात तेल उतरवणार आहेत. या दोन्ही जहाजांमध्ये मिळून सुमारे १४ लाख बॅरल रशियन 'युराल्स' कच्चं तेल आहे. ही ग्रेड भारतीय रिफायनरीजमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वर्षी अमेरिकेच्या दबावामुळे भारताला होणारा रशियन तेल पुरवठा काहीसा कमी झाला होता, परंतु सध्याची परिस्थिती पाहता अमेरिकेनं यात ३० दिवसांची सूट दिली आहे.
कोणत्या टँकरमध्ये किती तेल?
Odune: हे सुएझमॅक्स टँकर सुमारे ७.३ लाख बॅरल तेल घेऊन बुधवारी ओडिशामधील पारादीप बंदरात पोहोचले आहे.
Matari: हे अफ्रामॅक्स टँकर ७ लाख बॅरलपेक्षा जास्त तेलासह गुजरातच्या वाडीनार बंदरात पोहोचणार आहे.
Indri: हे सुएझमॅक्स टँकर आधी सिंगापूरला जात होते, परंतु या आठवड्यात अरबी समुद्रात दिशा बदलून ते भारताकडे वळलं आहे. यामध्ये सुमारे ७.३ लाख बॅरल युराल्स कच्चं तेल आहे.
जेट फ्युएल टँकरचाही आशियाकडे मोर्चा
इराण युद्धामुळे अनेक जेट फ्युएल टँकरनी युरोपऐवजी आशियाई बाजारपेठांकडे आपला मोर्चा वळवलाय. शिप-ट्रॅकिंग डेटानुसार, 'Navig8 Honor' नावाचे टँकर, जे पाश्चात्य बाजारपेठांकडे जात होते, त्यांनी आता आग्नेय आशियाकडे दिशा बदलली आहे. या टँकरमध्ये सुमारे ७५,००० टन (सुमारे ५.९१ लाख बॅरल) जेट फ्युएल आहे. 'Vortexa' या ऊर्जा विश्लेषण कंपनीच्या मते, सध्याच्या बाजारस्थितीनुसार भारताकडून जेट फ्युएल युरोपऐवी आशियाई देशांना पाठवणं जास्त फायदेशीर ठरत आहे.
Web Summary : Iran-Israel tensions benefit Russia as oil supplies shift. India receives discounted Russian oil, with tankers rerouting from East Asia due to Hormuz Strait concerns. Two tankers carrying Ural crude are headed to Indian ports, while jet fuel tankers also favor Asian markets.
Web Summary : ईरान-इज़राइल तनाव से रूस को फायदा हो रहा है, तेल आपूर्ति में बदलाव। भारत को रियायती रूसी तेल मिल रहा है, होर्मुज जलडमरूमध्य की चिंताओं के कारण टैंकर पूर्वी एशिया से फिर से मार्ग बदल रहे हैं। यूराल कच्चे तेल के दो टैंकर भारतीय बंदरगाहों की ओर बढ़ रहे हैं, जबकि जेट ईंधन टैंकर भी एशियाई बाजारों को पसंद कर रहे हैं।