Join us

अमेरिकेच्या Mcdonalds ला टक्कर देणार रशियाची 'अंकल वान्या' कंपनी, 'लोगो'वरुन वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 17:37 IST

McDonald's against Russian Invasion : युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाला त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक देशांनी रशियाविरुद्ध कठोर निर्बंध जाहीर केले आहेतच, पण अनेक मोठ्या कंपन्यांनी रशियातील त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत.

McDonald's against Russian Invasion : युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाला त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक देशांनी रशियाविरुद्ध कठोर निर्बंध जाहीर केले आहेतच, पण अनेक मोठ्या कंपन्यांनी रशियातील त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत. यामध्ये अमेरिकन कंपनी मॅकडोनाल्डचा समावेश आहे. या कंपनीनं आता रशियापासून स्वतःला दूर केलं आहे. पण रशिया देशात आता मॅकडोनाल्डचा पर्याय तयार करत आहे, ज्याचा लोगो मॅकडोनाल्डच्या लोगोसारखाच आहे. 

अमेरिकन कंपनी मॅकडोनाल्डने 8 मार्च रोजी युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रशियामधील 850 आउटलेट बंद करण्याची घोषणा केली. 'द एक्सप्रेस'मधील वृत्तानुसार, या निर्णयामुळे रशियन राजकारणी नाराज झाले आणि रशियन राज्य ड्यूमाचे अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांनी गेल्या आठवड्यात संसदेत या विषयावर भाषण दिलं. "मॅकडोनाल्ड्सने जाहीर केले आहे की ते रशियामधील त्यांचे आउटलेट बंद करणार आहेत,", असं ते म्हणाले. 

'अंकल वान्या' आणि मॅकडोनाल्डच्या लोगोत साम्य"उद्या मॅकडोनाल्ड नसलं तर अंकल वान्या असेल", असं वोलोदिन म्हणाले होते. त्याच आठवड्यात मॉस्कोमधील एका पेटंट वकिलानं 'अंकल वान्या'च्या लोगोसाठी अर्ज केला होता. वकिलानं अर्ज केलेला लोगो दिसायला मॅकडोनाल्डसारखाच आहे. फरक एवढाच की तळाशी 'अंकल वान्या' असं लिहिलं आहे. 1897 मध्ये प्रसिद्ध रशियन लेखक अँटोन चेखोव्ह यांच्या एका नाटकाचं नाव अंकल वान्या होतं. 

रशियामध्ये मॅकडोनाल्डचे 400 आऊटलेट्स बंदमॅकडोनाल्डने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र रशियाचा हा नवा लोगो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून यूजर्स याला मॅकडोनाल्डच्या लोगोची कॉपी म्हणत आहेत. युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियामधील सुमारे 400 आऊटलेट्स एकतर बंद झाले आहेत किंवा प्रभावित झाले आहेत. सर्वजण एकजुटीनं रशियन आक्रमणावर टीका करत आहेत.

टॅग्स :युक्रेन आणि रशियारशियायुद्ध