Join us

Gold Price: रशिया-युक्रेन युद्धामुळं सोन्याच्या बाजारात लागली 'आग'; 53,500 रुपयांवर पोहोचलं सोनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:30 IST

60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकतो सोन्याचा दर...

रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच आज भारतीय बाजारात सोन्याच्या दराने जबरदस्त उसळी घेतल्याचे दिसत आहे. एमसीएक्सवर वायदा व्यवसायात सोन्याचे दर 1.8 टक्क्यांनी वाढून 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये भारतीय बाजारात सोन्याच्या दराने 56,200 रुपये एवढी विक्रमी पातळी गाठली होती. 

जागतिक बाजारात, स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा दर 1.5 टक्क्याने वाढून 1,998.37 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. हा दर आधी 2,000.69 डॉलर होता, जो 18 महिन्यांत सर्वाधिक होता. एमसीएक्सवर चांदीचा दर 1.5 टक्क्यांनी वाढून 70173 रुपये प्रति किलो ग्रॅमवर पोहोचली आहे. खरे तर, जागतिक स्थरावरील तणावामुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढताना दिसत आहेत, याला सोने आणि चांदीही अपवाद नाहीत.

60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकतो सोन्याचा दर -कच्च्या तेलाने 140 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. तर सोन्याच्या दरातही आग लागली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध लांबले, तर सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही, तर सोने लवकरच 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :सोनंबाजारयुक्रेन आणि रशिया