Gold Storage : रशियाने २०२६ मध्ये आतापर्यंत तब्बल २२ टन सोनं विकल्याची माहिती समोर आली. हे समोर येताच लोकांमध्ये चर्चा रंगली की, रशियाने अचानक इतकं सोनं का विकलं असावं? यूक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियाची आर्थिक स्थिती बिकट तर नाही ना...? रशियाच्या या निर्णयाने आंतरराष्ट्रीय सोने बाजारात देखील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे कशामुळे करावं लागलं यावर वेगवेगळी मतंही समोर येत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रशियाच्या सेंट्रल बँकेने २०२६ मध्ये आतापर्यंत तब्बल २२ टन सोनं विकलंय. काही आकडेवारीनुसार रशियाने २०२६ सालात ३३४४० कोटी रूपयांना २२००० किलो सोनं विकलं. त्यामुळे रशियाकडे असलेल्या सोन्याच्या एकूण भांडारात ६.२२ टनाची घट झालीये. आता इतकं सोनं विकल्यानंतर अनेकांमध्ये याचीही उत्सुकता वाढली की, रशियाकडे नेमकं किती सोनं आहे आणि जगात सगळ्या जास्त सोनं कुणाकडे आहे. हेच आपण पाहणार आहोत.
रशियाकडे किती सोनं?
रशियाकडे एकूण जवळपास २ हजार ३०० टनांपेक्षा जास्त सोनं आहे. २०२६ च्या सुरूवातीच्या महिन्यांमध्ये खासकरून जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये १४ टन आणि मार्चमध्ये ६.२२ टन सोनं विकलं गेलं. यूक्रेनसोबत युद्ध, पाश्चिमात्य बंधनं आणि अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी रशियाला सोन्याचा वापर करावा लागत आहे.
सगळ्यात जास्त सोनं कुणाकडे?
अमेरिका
जगातील देशांपैकी सगळ्यात जास्त सोनं हे अर्थात अमेरिकेकडे आहे. अमेरिकेकडे सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल ८,१०० टन इतकं भरमसाठ सोनं आहे. हे सगळं सोनं देशातील फोर्ट नॉक्समध्ये सुरक्षित ठेवलं आहे.
जर्मनी
अमेरिकेनंतर सगळ्यात जास्त सोनं असण्याचा मान हा जर्मनीकडे जातो. जर्मनीकडे साधारण ३,३५० टन इतकं सोनं आहे. यूरोपमध्ये जर्मनीकडेच सगळ्यात जास्त सोनं आहे.
इटली
जर्मनीनंतर सगळ्यात जास्त सोन्याचा भांडार असण्याबाबत नंबर लागतो तो इटलीचा. इटलीकडे साधारण २,४५२ टन इतका सोन्याचा भांडार आहे.
फ्रान्स
इटलीनंतर नंबर येतो तो फ्रान्सचा. फ्रान्सकडे सोन्याचा साधारण २,४३७ टन इतका मोठा भांडार आहे.
चीन
सोन्याच्या भांडारासाठी चीनचा नंबर पाचवा येतो. सध्या चीनकडे साधारण २,३३० टन इतका सोन्याचा भांडार आहे. गेल्या काही वर्षात चीनने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केलं. गेल्या १७ महिन्यांपासून चीन सतत सोन्याचा भांडार वाढवत आहे.
Web Summary : Russia sold 22 tons of gold. It holds over 2,300 tons. The US has the most gold at 8,100 tons, followed by Germany, Italy, France, and China. Russia's sales are linked to the Ukraine war.
Web Summary : रूस ने 22 टन सोना बेचा। उनके पास 2,300 टन से अधिक सोना है। अमेरिका के पास सबसे अधिक 8,100 टन सोना है, उसके बाद जर्मनी, इटली, फ्रांस और चीन का नंबर आता है। रूस की बिक्री यूक्रेन युद्ध से जुड़ी है।