Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुपयाची १४ वर्षातील सर्वात मोठी घसरण; आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये डॉलरच्या तुलनेत १०% नं कमी झालं मूल्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:44 IST

Indian Rupee vs US Dollar: आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतीय रुपयाच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेत ९.८८ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. ही गेल्या १४ वर्षांतील डॉलरच्या तुलनेत झालेली सर्वात मोठी घसरण आहे. काय आहेत कारणं?

Indian Rupee vs US Dollar: आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतीय रुपयाच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेत ९.८८ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. ही गेल्या १४ वर्षांतील डॉलरच्या तुलनेत झालेली सर्वात मोठी घसरण आहे. यापूर्वी, आर्थिक वर्ष २०११-१२ मध्ये रुपयामध्ये १२.४ टक्क्यांची मोठी घसरण झाली होती, जेव्हा चालू खात्यातील तूट ४.२ टक्क्यांपर्यंत वाढली होती. मात्र, आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील या घसरणीमागे परदेशी निधी काढला जाणं, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक स्तरावर डॉलरचं मजबूत होणं ही प्रमुख कारणं राहिली आहेत.

डॉलरच्या तुलनेत इतर आशियाई चलनांची कामगिरी

जागतिक आर्थिक बाजारपेठेतील चढ-उतार आणि रोखीची टंचाई यामुळे २०२५-२६ मध्ये रुपयावर अधिक दबाव निर्माण झाला. बाजार तज्ज्ञांच्या मते, १ एप्रिलपासून इतर आशियाई चलनांमध्येही डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत जपानी येन ६ टक्के, फिलिपिन्सचे पेसो ५.७४ टक्के आणि दक्षिण कोरियन वॉन २.८८ टक्क्यांनी कमकुवत झाले. दक्षिण कोरियन बँक 'शिन्हान बँक'चे भारतातील ट्रेझरी प्रमुख सुनल सोधानी यांनी सांगितलं की, बाह्य धक्के, भांडवल बाहेर जाणं अशा अनेक समस्या एकाच वेळी आल्यामुळे २०२५-२६ मध्ये रुपया कमकुवत झाला आहे.

१५% च्या घसरणीनंतर सोनं सावरलं, चांदीही सुस्साट; का आली किमतीत तेजी

अमेरिकन टॅरिफ आणि पश्चिम आशियातील तणावाचा दबाव

सुनल सोधानी यांच्या मते, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रभाव टाकणारे घटक २०११-१२ च्या घटकांपेक्षा वेगळे आहेत. २०२५-२६ मध्ये चलनाची घसरण तेव्हा सुरू झाली जेव्हा अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादलं, ज्यामुळे डॉलरच्या मागणीत मोठी वाढ झाली. त्यानंतर, इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर पश्चिम आशियामध्ये तणाव वाढला. या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि रुपयावरील दबाव अधिकच तीव्र झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Rupee plummets to 14-year low against dollar in FY26.

Web Summary : The Indian rupee fell 9.88% against the dollar in FY26, the largest drop in 14 years, driven by foreign fund outflows, rising oil prices and a strong dollar. Other Asian currencies also weakened. Geopolitical tensions and US tariffs added pressure.
टॅग्स :पैसा