Join us

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण; घसणीचा काय होऊ शकतो परिणाम? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:03 IST

Rupee Hits Record Low: येत्या सहा ते दहा महिन्यांत भारतीय रुपया ९२ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Rupee Hits Record Low: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयानं आतापर्यंतचा नीचांकी स्तर गाठलाय. बुधवारी रुपया ९ पैशांनी घसरून ८५.८३ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. याचं मुख्य कारण म्हणजे डॉलर निर्देशांक मजबूत होणं. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर निर्देशांक सातत्यानं वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत शेअर बाजारातील मंदीमुळे भारतीय चलनावर दबाव आलाय. दुसरीकडे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात करण्यास उशीर होण्याची अपेक्षा वाढल्यानं अमेरिकन ट्रेझरी यील्ड तसेच डॉलरच्या मागणीत विक्रमी वाढ झाली.

त्याचबरोबर कॉर्पोरेट करकपात, शुल्कवाढ अशा डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे महागाई वाढत आहे. चीनच्या पतधोरणातील लवचिकताही डॉलरच्या मजबुतीला हातभार लावत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या पतधोरणात लवचिकता न आणल्यास रुपया आणखी घसरेल, असं म्हटलं जातंय. येत्या सहा ते दहा महिन्यांत भारतीय रुपया ९२ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे २०२४-२५ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर चार वर्षांतील नीचांकी ६.४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. २००८ पासून डॉलरच्या तुलनेत रुपया ९० टक्क्यांनी घसरला आहे.

रुपया कमकुवत होण्यामागे अनेक कारणं

भारतानं निर्यातीपेक्षा जास्त आयात केली तर डॉलरची मागणी वाढते आणि रुपयाची मागणी कमी होते, त्यामुळे रुपया कमकुवत होतो. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून आपलं भांडवल काढून घेतलं तर डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कमकुवत होतो. रिझर्व्ह बँकेनं व्याजदर कमी केल्यास गुंतवणूकदार इतर चलनातील गुंतवणुकीसाठी रुपया विकतात, ज्यामुळे रुपया कमकुवत होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की भारताला तेल आयातीसाठी अधिक डॉलर खर्च करावे लागतात, त्यामुळे रुपयावरील दबाव वाढतो. रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात महाग होते, त्यामुळे महागाई वाढते. त्याचबरोबर परकीय चलनात घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा बोजा वाढतो.

घसरणीचा फटका?

रुपयाच्या घसरणीचा अर्थ भारतासाठी वस्तूंची आयात महाग होणार आहे. याशिवाय परदेशात फिरणं आणि अभ्यास करणंही खर्चिक होईल.

फायदे

परदेशी पर्यटकांसाठी भारतात येणं स्वस्तभारतीय वैद्यकीय पर्यटन उद्योगाला फायदेपरदेशातून डॉलर पाठवून तुम्हाला इथे जास्त पैसे मिळतीलव्यापाऱ्यांना निर्यातीपेक्षा अधिक फायदा

नुकसान

परदेशात शिक्षण घेणं आणि प्रवासासाठी जाणे महागात पडेलपेट्रोलियम आणि सोन्याचे दर वाढणारवस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढणारदेशातील परकीय गुंतवणूक कमी होईल

टॅग्स :पैसागुंतवणूक