Rupee vs Dollar : भारतीय रुपयाची घसरण थांबायचं नाव घेताना दिसत नाही. रुपयातील घसरण सलग चौथ्या दिवशीही कायम राहिली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करूनही रुपयाला कोणताही आधार मिळाला नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी, रुपयामध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली गेली आणि तो २४ पैशांनी तुटून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ९०.५६ प्रति डॉलर या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला.
बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारत-अमेरिका व्यापार करारासंबंधी असलेली अनिश्चितता आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची सततची विक्री, यामुळे रुपयावर मोठा दबाव आला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावानांवर परिणाम होत आहे.
विक्रमी नीचांकी पातळीवर रुपया का पोहोचला?
- आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढली: विदेशी मुद्रा व्यापाऱ्यांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे आयातदारांकडून डॉलरची मागणी अचानक वाढली. आयात महाग झाल्यावर कंपन्या जास्त डॉलर खरेदी करतात, ज्यामुळे रुपयावर दबाव येतो.
- कमकुवत डॉलर इंडेक्सचा आधार नाही : डॉलर इंडेक्स, जो सहा प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरची मजबूती दर्शवतो, तो ९८.३७ पर्यंत किंचित वाढला, ज्यामुळे रुपयावर अतिरिक्त दबाव आला.
- सलग घसरण : गुरुवारीही रुपयामध्ये ३८ पैशांची मोठी घसरण झाली होती आणि तो ९०.३२ रुपयांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला होता.
बाजार आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भूमिका
- आज भारतीय शेअर बाजार सकारात्मक उघडला असला तरी, रुपयाला त्याचा काहीही विशेष आधार मिळाला नाही.
- विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी २,०२० कोटी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ विक्री केली, ज्यामुळे बाजारावर विक्रीचा दबाव वाढला आणि रुपयावर नकारात्मक परिणाम झाला.
- आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाची किंमत ०.६७% वाढून ६१.६९ डॉलर प्रति बॅरल वर पोहोचली, ज्यामुळे रुपयावर महागाईचा दबाव वाढला.
विशेषज्ञांचे मत आणि पुढील अंदाजमिराए ॲसेट शेअरखानचे विश्लेषक अनुज चौधरी यांच्या मते, भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतची अनिश्चितता हे रुपयाच्या घसरणीचे सर्वात मोठे कारण आहे. त्यांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांमध्ये रुपयामध्ये चढउतार राहण्याची शक्यता आहे. व्यापार कराराला उशीर झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती वाढू शकते. डॉलर-रुपया विनिमय दर नजीकच्या काळात ९०.१० ते ९०.७५ रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय बँक रुपयाला आधार देण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.
Web Summary : The rupee plummeted to a record low of 90.56 against the dollar due to importer demand, a slightly stronger dollar index, and continuous decline. Trade deal uncertainty and foreign investor selling pressure also contributed to the rupee's weakness. Experts predict continued volatility.
Web Summary : रुपया डॉलर के मुकाबले 90.56 के रिकॉर्ड निचले स्तर पर आ गया, जिसका कारण आयातक मांग, थोड़ा मजबूत डॉलर इंडेक्स और लगातार गिरावट है। व्यापार समझौते की अनिश्चितता और विदेशी निवेशक बिक्री दबाव ने भी रुपये की कमजोरी में योगदान दिया। विशेषज्ञों का अनुमान है कि अस्थिरता जारी रहेगी।