Join us

LPG सिलिंडर, कारच्या किमती अन् पेन्शन, 1 जानेवारीपासून होणार 'हे' 6 बदल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 19:48 IST

Rule Change 2025: नवीन वर्ष पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारे आहे.

Rule Change 2025: नवीन वर्ष सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षात नवीन नियमदेखील येत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये कारच्या किमती, LPG सिलिंडरच्या किमती, पेन्शनशी संबंधित नियम, Amazon प्राइम मेंबरशिप, UPI नियम आणि FD संबंधित नियमांचा समावेश आहे.

1. कारच्या किमती वाढणारनवीन वर्षात कार खरेदी करणे महागणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून, मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, होंडा, मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि BMW सारख्या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमती 3% ने वाढवतील. कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण सांगितले आहे. त्यामुळे, तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागू शकतो.

2. LPG सिलेंडरच्या किमती वाढणारदर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल झालेला नाही. सध्या दिल्लीत त्याची किंमत 803 रुपये आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $73.58 आहे, ज्यामुळे भविष्यात किंमती बदलू शकतात.

3. पेन्शन काढण्यात बदलनवीन वर्ष पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारे आहे. 1 जानेवारी 2025 पासून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पेन्शन काढण्याचे नियम सोपे केले आहेत. आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे. यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही. ही सुविधा पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा आहे.

4. Amazon Prime सदस्यत्वाचे नवीन नियम

Amazon प्राइम सदस्यत्वाच्या नियमांमध्ये बदल जाहीर करण्यात आले आहेत, जे 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. नवीन नियमांनुसार, प्राइम व्हिडिओ एका प्राइम खात्यातून फक्त दोन टीव्हीवर स्ट्रीम केला जाऊ शकतो. जर एखाद्याला तिसऱ्या टीव्हीवर प्राइम व्हिडिओ पाहायचा असेल, तर त्याला अतिरिक्त सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. पूर्वी प्राइम सदस्य एकाच अकाउंटवरुन पाच डिव्हाइसवर व्हिडिओ पाहू शकत होते.

5. मुदत ठेवीचे नियम (FD)

RBI ने NBFC आणि HFC साठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलले आहेत. नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. या बदलांतर्गत ठेवींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकांकडून ठेवी घेणे, मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवींचा विमा करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे.

6. UPI 123p ची नवीन व्यवहार मर्यादा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या UPI 123Pay सेवेमध्ये व्यवहार मर्यादा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी या सेवेअंतर्गत कमाल 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत होते, परंतु आता ही मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सुविधा 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.

टॅग्स :व्यवसायइयर एंडर 2024वाहन उद्योगकारबँकिंग क्षेत्रभारतीय रिझर्व्ह बँक