Join us
Daily Top 2Weekly Top 5

१२०० रुपयांचं वेतन, आता ११५०० कोटींची कंपनी; १५० वर्षे जुन्या वडिलोपार्जित व्यवसायानं बदललं नशीब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:04 IST

कोठारी यांनी आपल्या १५० वर्ष जुन्या वडिलोपार्जित व्यवसायाला यशाच्या शिखरावर पोहोचवून नाव कमावलं आहे.

Success Story : देशात टाटा, बिर्ला अशी अनेक उद्योगपती कुटुंबं आहेत. ज्यांचा कौटुंबिक व्यवसाय वर्षानुवर्षे सुरू आहे. ही प्रसिद्ध नावं सर्वांनाच माहीत असली तरी, आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची यशोगाथा सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या १५० वर्ष जुन्या वडिलोपार्जित व्यवसायाला यशाच्या शिखरावर पोहोचवून नाव कमावलं आहे.

आज आम्ही सांगत आहोत देशातील प्रमुख इन्व्हेस्टमेंट बँकर्सपैकी एक हेमेंद्र कोठारी यांच्याबद्दल. त्याच्या असेट्स मॅनेजमेंट कंपनीची मालमत्ता १५ अब्ज डॉलर्स आहे. ते डीएसपी इन्व्हेस्टमेंटचे अध्यक्ष आहेत. आर्थिक क्षेत्रात काम करणं हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. जो कोठारी यांनी पुढे नेला आणि देशात, तसंच जगात स्वतःची ओळख निर्माण केली.

मिलमधून कारकिर्दीची सुरुवातहेमेंद्र कोठारी यांच्या कुटुंबीयांकडे पाह इन्व्हेस्टमेंट बँकिंग या कौटुंबिक व्यवसायात त्यांचा प्रवेश होणं स्वाभाविक होतं. त्यांचे आजोबा पुरभूदास जीवनदास कोठारी हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे (BSE) संस्थापक होते. शिक्षणानंतर त्यांनीदेखील फायनान्शिअल मार्केटमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

हेमेंद्र कोठारी यांनी मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कापड गिरणीतून केली. 'मनी लाईफ'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या कारकिर्दीविषयी उलगडा केला. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना शेअर मार्केटमध्ये काम न करण्याचा सल्ला दिला होता, असं ते म्हणाले. डीएनएच्या रिपोर्टनुसार, त्यावेळी त्यांना १२०० रुपये पहिला पगार मिळाला होता.

वडिलोपार्जित व्यवसायात यश१९६९ मध्ये त्यांनी त्यांची फॅमिली फर्म 'डी.एस. पुरभूदास अँड कंपनी सह फायनान्स क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर हेमेंद्र कोठारी यांनी १९७५ मध्ये डीएसपी फायनान्शियल कन्सल्टंट्सची स्थापना केली. हेमेंद्र कोठारी यांनी २००८ मध्ये ब्लॅकरॉकच्या भागीदारीत डीएसपी इन्व्हेस्टमेंट्स सुरू केली.

'फोर्ब्स'नुसार, हेमेंद्र कोठारी हे मुंबईतील अब्जाधीश व्यावसायिकांपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती १.४ अब्ज डॉलर म्हणजे ११,५०० कोटी रुपये आहे. या संपत्तीसह, ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत २,१४० व्या स्थानावर आहेत.

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी