Join us

शाही हिऱ्याचा होणार लिलाव; ‘गोवळकोंडा ब्ल्यू’ ४३० कोटींना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 09:27 IST

२३.२४ कॅरेटच्या या नीलरत्नास लिलावात ३०० ते ४३० कोटी रुपयांपर्यंत किंमत येऊ शकते, असा अंदाज आहे.

नवी दिल्ली : राजघराण्यांचा वारसा लाभलेला ‘गोवळकोंडा ब्ल्यू’ नामक अत्यंत दुर्मीळ हिऱ्याचा १४ मे रोजी जिनेव्हा येथील ‘क्रिस्टीज’च्या ‘मॅग्निफिकंट ज्वेल्स’मध्ये प्रथमच लिलाव होणार आहे. ‘गोवळकोंडा ब्लू’ हिरा एकेकाळी इंदौर आणि बड़ौदा येथील महाराजांच्या संग्रही होता. 

२३.२४ कॅरेटच्या या नीलरत्नास लिलावात ३०० ते ४३० कोटी रुपयांपर्यंत किंमत येऊ शकते, असा अंदाज आहे. हा हिरा इंदौरचे महाराजा यशवंतराव होळकर द्वितीय यांच्या मालकीचा होता नंतर तो बडोद्याचे महाराजांकडे आला. 

टॅग्स :पैसामध्य प्रदेशआंतरराष्ट्रीय