Rich Dad Poor Dad : 'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेबाबत भीतीदायक, पण तितकीच संधी देणारी भविष्यवाणी केली आहे. "इतिहासातील सर्वात मोठा शेअर बाजार क्रॅश उंबरठ्यावर असून, जे तयार नाहीत त्यांच्यासाठी हे एक 'भयानक स्वप्न' असेल," असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र, त्याच वेळी ही मंदी काहींना त्यांच्या स्वप्नापेक्षा जास्त श्रीमंत बनवेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
२०१३ ची भविष्यवाणी आता खरी होणार?कियोसाकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक सविस्तर पोस्ट लिहून ही वॉर्निंग दिली आहे. त्यांनी नमूद केले की, "२०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'रिच डॅड्स प्रॉफेसी' या पुस्तकात मी ज्या महामंदीची शक्यता वर्तवली होती, ती वेळ आता जवळ आली आहे. बाजार कोसळण्याची मी केवळ वाट पाहत नसून त्यासाठी पूर्णपणे तयार आहे."
"क्रॅश ही श्रीमंत होण्याची सर्वात मोठी संधी"कियोसाकी यांच्या मते, मंदी किंवा बाजार कोसळणे ही घाबरण्याची गोष्ट नाही, तर ती खरेदीची सुवर्णसंधी आहे. मार्केट क्रॅश झाल्यावर अनेक 'अनमोल मालमत्ता' स्वस्त दरात विक्रीसाठी उपलब्ध असतात. ज्यांनी माझ्या 'रिच डॅड'चा सल्ला ऐकून आधीच तयारी केली आहे, त्यांच्यासाठी हा क्रॅश श्रीमंतीची गुरुकिल्ली ठरेल.
बिटकॉईन आणि मौल्यवान धातूंवर 'बुलिश'या मोठ्या संकटापासून वाचण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी कियोसाकी यांनी आपल्या पोर्टफोलिओमधील गुपितेही शेअर केली आहेत. "माझ्याकडे 'खरे' सोने, चांदी आणि बिटकॉईन आहेत, कोणतेही कागदी पर्याय नाहीत." बीटकॉईनची किंमत जेवढी खाली येईल, तेवढी मी अधिक खरेदी करेन. जगात केवळ २१ दशलक्ष बिटकॉईन असणार आहेत, त्यामुळे जेव्हा लोक घाबरून विक्री करतील, तेव्हा मी खरेदी करून माझी संपत्ती वाढवेन.
वाचा - कर्ज घेण्यासाठी आता 'सिबिल'ची गरज नाही! वीज बिल आणि मोबाईल रिचार्जवरून ठरणार तुमची 'पत'
गुंतवणूकदारांना सल्लाकियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना 'फेक' मालमत्तेपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, जेव्हा जागतिक चलन व्यवस्था अस्थिर होते, तेव्हा सोने, चांदी आणि बिटकॉईन हेच सुरक्षित पर्याय ठरतात.
Web Summary : Robert Kiyosaki predicts a major stock market crash, creating opportunities for prepared investors. He advises investing in gold, silver, and Bitcoin, avoiding 'fake' assets. Kiyosaki believes this crash will make informed investors richer as they buy undervalued assets.
Web Summary : रॉबर्ट कियोसाकी ने शेयर बाजार में बड़ी गिरावट की भविष्यवाणी की है, जिससे तैयार निवेशकों के लिए अवसर पैदा होंगे। उन्होंने सोने, चांदी और बिटकॉइन में निवेश करने और 'नकली' संपत्तियों से बचने की सलाह दी है। कियोसाकी का मानना है कि यह गिरावट जानकार निवेशकों को अमीर बनाएगी।