मुंबई : आधीच्या सप्ताहामध्ये कमी झालेली भारताची परकीय चलन गंगाजळी २६ जून रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये १.२७ अब्ज अमेरिकन डॉलरने वाढली आहे. आता त्यामध्ये ५०६.८४ अब्ज अमेरिकन डॉलरची मालमत्ता आहे.१९ जून रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये परकीय चलन गंगाजळी २.०८ अब्ज डॉलरने कमी होऊन ५०५.५७ अब्ज अमेरिकन डॉलरवर आली होती. ५ जून रोजी संपलेल्या सप्ताहात या गंगाजळीने प्रथमच ५०० अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा पार केलेला दिसून आला.
देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 03:22 IST