Join us
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ देशात स्वस्त, तर जगात हाेणार महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 07:40 IST

अपुऱ्या पावसामुळे मागील दहा दिवसांत भारतातील तांदळाच्या दरात २० टक्के वाढ झाली आहे

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात तांदळाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारने बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. यामुळे तांदळाचे दर किती कमी हाेतील, हे काही दिवसांमध्ये स्पष्ट हाेईलच. मात्र, भारताच्या निर्णयामुळे जगाची चिंता वाढली आहे. 

अपुऱ्या पावसामुळे मागील दहा दिवसांत भारतातील तांदळाच्या दरात २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा ८० टक्के तांदूळ निर्यातीवर परिणाम होणार आहे. भारताचा तांदूळ कमी झाल्यामुळे जागतिक किमती वाढतील. सरकार तांदळाच्या इतर प्रकारांवरही निर्यातबंदी करू शकते.

भारत जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार४०% वाटा भारताचा जगाच्या एकूण तांदळाच्या निर्यातीत आहे.१३ काेटी टन तांदळाचे उत्पादन भारतात गेल्या आर्थिक वर्षात झाले हाेते.२.२ काेटी टन तांदळाची गेल्यावर्षी वाटा हाेता. १ काेटी टन पांढऱ्या तांदळाचा त्यात समावेश आहे. 

 

टॅग्स :व्यवसायशेतकरीअन्न