Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीचे वय ६०, ग्रॅच्युएटीची मर्यादा २० लाख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:29 IST

केंद्राप्रमाणे प्रगती योजनेत ५ हजार ४०० रुपयांची ग्रेड पे मर्यादा रद्द करण्यात यावी ही कर्मचाऱ्यांची मागणीही मान्य करण्याचे आश्वासन मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिल्याची माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली. 

मुंबई : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय ६०, ग्रॅच्युएटीची मर्यादा २० लाख करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. केंद्राप्रमाणे प्रगती योजनेत ५ हजार ४०० रुपयांची ग्रेड पे मर्यादा रद्द करण्यात यावी ही कर्मचाऱ्यांची मागणीही मान्य करण्याचे आश्वासन मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिल्याची माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी महासंघ व कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात निवृत्त सचिव सुबोध कुमार समिती नियुक्ती करण्यात आली होती. या समितीचा अहवाल २० नोव्हेंबरपर्यंत शासनाला सादर होईल, असे आश्वासन यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिले. 

टॅग्स :पैसा