Iran War Ceasefire Crude Oil Price: अमेरिकेनं इराणसोबत शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचे दर वेगानं घसरून १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आलेत, तर अमेरिकन शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराण युद्धात दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर आर्थिक आघाड्यांवर मोठे बदल झालेत. डाऊ जोन्स फ्युचर्स ९०० अंकांनी वधारला आहे. आज बाजार उघडल्यानंतर भारत आणि आशियाई बाजारातही अशीच तेजी दिसून येऊ शकते; गिफ्ट निफ्टी (GIFT Nifty) ग्रीन झोनमध्ये आल्यानं अशाच प्रकारचे संकेत मिळत आहेत.
कच्च्या तेलाच्या दरात २० डॉलरची घसरण
बुधवारी अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) कच्च्या तेलाची किंमत सुमारे २० डॉलर प्रति बॅरलनं घसरली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाल्याचं सांगितल्यानंतर हे बदल झाले. 'होर्मुझची सामुद्रधुनी' तातडीनं आणि सुरक्षितपणं पुन्हा उघडली जाईल, या अटीवर हा करार आधारित आहे. मे महिन्याच्या डिलिव्हरीसाठी WTI क्रूडची किंमत १८.१० डॉलर किंवा १६.०२% नी घसरून ९४.८५ डॉलर प्रति बॅरल झाली आहे. २६ मार्चनंतर ही किंमत ९१.०५ डॉलर या नीचांकी स्तरावर पोहोचली होती.
डेडलाइनपूर्वी शस्त्रसंधीची घोषणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी दिलेली मुदत संपण्यापूर्वीच ही शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. या जलमार्गातून जगातील सुमारे २०% तेलाची वाहतूक होते, त्यामुळे या क्षेत्राचं महत्त्व सर्वाधिक आहे.
Web Summary : US-Iran ceasefire triggers market optimism. Oil prices plummet below $100/barrel. Dow Jones futures soar. Indian and Asian markets expected to follow suit, signaling positive global economic impact.
Web Summary : अमेरिकी-ईरान युद्धविराम से बाजार आशावादी। तेल की कीमतें 100 डॉलर प्रति बैरल से नीचे। डाऊ जोन्स वायदा में उछाल। भारतीय और एशियाई बाजारों में तेजी की उम्मीद, सकारात्मक वैश्विक आर्थिक प्रभाव का संकेत।