Join us

ऑनलाइन विक्री क्षेत्रातही रिलायन्स करणार धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 06:20 IST

ऑनलाईन किरकोळ विक्री क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट (वॉलमार्टकडून अधिग्रहित) यांच्याशी सामना करण्याची जोरदार तयारी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने केली आहे.

नवी दिल्ली : ऑनलाईन किरकोळ विक्री क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट (वॉलमार्टकडून अधिग्रहित) यांच्याशी सामना करण्याची जोरदार तयारी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने केली आहे. कंपनी आपला स्वत:चा आॅनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे. पश्चिम भारतातील १२ लाख किरकोळ विक्रेते आणि स्टोअर मालकांना या प्लॅटफॉर्मशी जोडून कंपनी या क्षेत्रातही मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे.बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्सकडून आपली जिओ दूरसंचार सेवा, मोबाईल उपकरणे आणि प्रत्यक्ष विक्रेते व स्टोअर्सचे फिजिकल नेटवर्क यांची अनोखी सांगड घालण्यात येत आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स