Join us  

मुकेश अंबानी देणार एलन मस्कला टक्कर; रिलायन्स आता 'या' क्षेत्रात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 2:12 PM

उद्योग जगतात आताच्या घडीला मोठी चढाओढ असल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर सर्वांत श्रीमंत असलेल्या व्यक्ती एकमेकांवर अनेकविध पद्धतीने कुरघोडी करताना पाहायला मिळत आहेत. ई-कॉमर्समध्ये आघाडीवर असलेल्या अॅमेझॉन कंपनीने रिलायन्स आणि फ्युचर रिटेल यांच्यातील व्यवहाराला आव्हान दिले आहे. तर, दुसरीकडे रिलायन्स कंपनीचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता जागतिक पातळीवरील एलन मस्क (Elon Musk) यांच्या अग्रगण्य कंपनी टेस्लासमोर नवे आव्हान उभे करण्याची तयारी करत आहेत.

ठळक मुद्देरिलायन्सला आता नवीन उद्योगाची भुरळभारतात ई-मोटारींच्या पर्वाकडे अंबानी यांचे लक्षएलन मस्क यांच्या टेस्लाला टक्कर देण्यास मुकेश अंबानींची तयारी

नवी दिल्ली : उद्योग जगतात आताच्या घडीला मोठी चढाओढ असल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर सर्वांत श्रीमंत असलेल्या व्यक्ती एकमेकांवर अनेकविध पद्धतीने कुरघोडी करताना पाहायला मिळत आहेत. ई-कॉमर्समध्ये आघाडीवर असलेल्या अॅमेझॉन कंपनीने रिलायन्स आणि फ्युचर रिटेल यांच्यातील व्यवहाराला आव्हान दिले आहे. तर, दुसरीकडे रिलायन्स कंपनीचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता जागतिक पातळीवरील एलन मस्क (Elon Musk) यांच्या अग्रगण्य कंपनी टेस्लासमोर नवे आव्हान उभे करण्याची तयारी करत आहेत. (reliance mukesh ambani ready to compete elon musk)

जागतिक पातळीवर सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनच्या जेफ बेझॉस यांनी रिलायन्स रिटेल आणि फ्युचर रिटेल यांच्यातील व्यवहाराला आव्हान दिले आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. हा वाद सुरू असताना उद्योजक मुकेश अंबानी यांना इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्र खुणावत असून, इलेक्ट्रिक मोटारीसाठी लागणाऱ्या बॅटरी उत्पादनात करण्याची तयारी रिलायन्सकडून केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. 

केवळ एकच डोस पुरेसा; 'या' कंपनीची कोरोना लस मंजुरीच्या प्रतीक्षेत

ई-बॅटरी उद्योगाची ५० अब्जाची उलाढाल

आताच्या घडीला इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. विजेवर चालणाऱ्या मोटारींसाठी लागणाऱ्या बॅटरी आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राची बाजारपेठ झपाट्याने वाढणार असून, पुढील १० वर्षात ई-बॅटरी उद्योगाची उलाढाल ५० अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणूनच आता अंबानी यांनी या क्षेत्रातील औद्योगिक संधीवर लक्ष केंद्रित केले असून, रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या क्षेत्रात प्रारंभिक टप्प्यात किमान १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

टेस्लाशी थेट स्पर्धा

इलेक्ट्रिक मोटार उद्योगात टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. या क्षेत्रात रिलायन्सने प्रवेश केला तर त्यांची थेट स्पर्धा इलेक्ट्रिक मोटार निर्मितीतील आघाडीची कंपनी टेस्लाशी होईल. गेल्या वर्षी अंबानी यांनी इलेक्ट्रिक मोटार उद्योगासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे समभागधारकांना सांगितले होते. अंबानी बॅटरी निर्मितीमध्ये उतरतील तसेच वीज साठवणूक (स्टोरेज) उत्पादनांमध्ये उतरतील, असे म्हटले जात आहे.

भारतात ई-मोटारींचे पर्व 

आगामी काळात सुरू होणाऱ्या ई-वाहनांच्या पर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची तयारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सुरू केली आहे. नवीन ऊर्जा आणि नव्या इंधन व्यवसायाला चालना देण्यासाठी तयार असल्याचे रिलायन्सकडून सांगण्यात आले आहे. नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजने तेल आणि रसायन उद्योगाचे विभाजन केले असून, ही नव्या उद्योगात एंट्री घेण्याची तयारी असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सअ‍ॅमेझॉनटेस्ला