Join us

मुकेश अंबानींचा Jiobook मेड इन चायना; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 21:25 IST

भारतात लॉन्च झालेला Jiobook भारतात नाही तर चीनमध्ये तयार करण्यात आला आहे.

Reliance Jiobook: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्सने JioBook लॉन्च केले आहे. जिओ नाव ऐकून तुम्ही याला मेड-इन-इंडिया लॅपटॉप समजण्याची चूक करू नका. हे लॉपटॉप रिलायन्सने लॉन्च केले आहे, पण याची निर्मिती चीनमध्ये झाली आहे. ही गोष्ट ऐकून विचित्र वाटत असली तरी हेच सत्य आहे. जिओबुकची विक्री रिलायन्स जिओ नव्हे तर रिलायन्स रिटेलद्वारे केली जात आहे. 

JioBook चे उत्पादन चीनमधील Hunan Greatwall Computer System ही कंपनी करत आहे. मुकेश अंबानींचे जिओबुक भारतात नव्हे तर चीनमध्ये बनले आहे, असा याचा स्पष्ट अर्थ आहे. अमेझॉनच्या वेबसाइटवर जिओबुकचे नवीन मॉडेल शोधल्यास चिनी उत्पादकाचे नाव स्पष्टपणे दिसेल.

केंद्राच्या निर्णयामुळे अंबानींना तोटा केंद्र सरकारने अलीकडेच लॅपटॉप आयातीवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे रिलायन्स रिटेलवर मोठा परिणाम होणार आहे. JioBook चे नावदेखील बंदी घातलेल्या यादीत येते, कारण हा मेड-इन-चायना लॅपटॉप आहे. जिओबुकचे फर्स्ट आणि सेंकड जनरेशन मॉडेल्स चीनमध्ये बनवलेले आहेत.

भारतात लॅपटॉप आयात बंदी3 ऑगस्ट रोजी भारत सरकारने लॅपटॉप, टॅबलेट आणि सर्व पर्सल कॉम्प्युटर्सच्या आयातीवर काही निर्बंध लादले आहेत. आता कंपन्यांना लॅपटॉप, पर्सनल कॉम्प्युटर आणि टॅबलेट यांसारखी उपकरणे आयात करण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत भारतात अशा उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीव्यवसायचीनकेंद्र सरकार