Reliance Jio च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त सेवा देत असलेली रिलायन्स जिओ आपल्या अनेक पॅक्ससोबत काही अॅप्सचा कॉम्पिमेंट्री अॅक्सेस देत असते. रिलायन्स जिओचे ग्राहक Jio TV या अॅपचाही लाभ घेऊ शकतात. याद्वारे लाईव्ह टीव्ही चॅनल्स ग्राहकांना पाहता येतात. परंतु आता जिओच्या ग्राहकांना भारत विरूद्ध इंग्लंड २०२१ या मालिकेचे सामने मोफत पाहता येणार आहे. यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही. या सेवेचा ज्यांना लाभ घ्यायचा असेल त्यांना गुगल प्ले स्टोअर मधून किंवा अॅपलच्या अॅप स्टोअर मधून हे अॅप डाऊनलोड करून त्याचा लाभ घेता येईल. India vs England 2021 या सामन्याचे हायलाईट्स आणि प्रत्येक सामना हा जिओ टीव्हीवर मोफत पाहता येणार आहे. जिओ युझर्सना ते ठराविक चॅनल्स पाहता येतील ज्यावर या सीरिसचं प्रक्षेपण केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणीच हे सामने स्ट्रिमही करता येतील. तसंच निरनिराळ्या भाषांमध्ये ही सीरिज युझर्सना पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त युझर्सना India vs England 2021 चे सामने पाहायचे असतील तर आणखी एक पर्यायदेखील आहे. यात ग्राहकांना डिज्नी हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन असलेला प्लॅन घ्यावा लागणार आहे. तर पोस्टपेड सेवाचा लाभ घेणाऱ्यांनाही ज्या प्लॅनसोबत हे सबस्क्रिप्शन मिळत असेल तो प्लॅन सिलेक्ट करावा लागेल. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजला सुरूवात झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडनं मोठ्या फरकानं पराभव केला होता. २८ मार्च २०२१ पर्यंत ही मालिका सुरू राहणार असून यादरम्यान एकदिवसीय आणि टी २० सामनेही खेळवले जाणार आहेत.
Reliance Jio धमाका! India vs England सीरीज मोफत पाहू शकणार युझर्स; फक्त एकच छोटी अट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 17:34 IST
India vs England 2021 : रिलायन्स जिओनं ग्राहकांना दिली सामने मोफत पाहण्याची संधी
Reliance Jio धमाका! India vs England सीरीज मोफत पाहू शकणार युझर्स; फक्त एकच छोटी अट...
ठळक मुद्देरिलायन्स जिओनं ग्राहकांना दिली सामने मोफत पाहण्याची संधीकोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही