Join us

Jio ची जबरदस्त न्यू ईयर ऑफर; १३ महिन्यांची व्हॅलिडिटी, दिवसाचा खर्च केवळ ७ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 17:21 IST

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रिलायन्स जिओ वर्षाच्या अखेरीस आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे.

Jio New Year Plan: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रिलायन्स जिओ वर्षाच्या अखेरीस आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. जिओ 2,999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवर 24 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर करत आहे. ही ऑफर Jio च्या न्यू ईयर ऑफर अंतर्गत उपलब्ध आहे. जिओच्या या ऑफरनंतर या प्लॅनचा एका दिवसाचा खर्च 8.21 रुपयांवरून 7.70 रुपयांपर्यंत कमी होईल.जिओचा 2,999 रुपयांचा प्लॅन वार्षिक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. जिओच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 12 महिने म्हणजेच 365 दिवस आहे. आता हा प्लान न्यू ईयर ऑफर अंतर्गत 24 दिवसांच्या अतिरिक्त वैधतेसह येत आहे. एकदा रिचार्ज केल्यानंतर, जिओ युझर्सना 365 दिवसांऐवजी 389 दिवसांची वैधता मिळेल. तुमचे Jio सिम सुमारे 13 महिने अॅक्टिव्ह राहील.काय आहेत बेनिफिट्स?जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. तुम्ही राहत असलेल्या भागात जिओची 5G सेवा असल्यास, या प्लॅनवर 5G सेवाही उपलब्ध असेल. तुम्हाला वर्षाला सुमारे 912.5GB डेटा मिळेल. दैनंदिन इंटरनेट डेटा संपल्यानंतर, स्पीड कमी होऊन 64Kbps होईल.आणखी कोणते फायदे?प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल सांगायचं झाल्यास यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सेवा उपलब्ध आहेत. कंपनी JioCinema, JioTV आणि JioCloud सारख्या जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. यामध्ये प्रीमियम प्लॅन JioCinema चं सबस्क्रिप्शन देण्यात येत नाही. ते स्वतंत्रपणे विकत घ्यावं लागणार आहे.. प्लॅनवरील ही ऑफर 20 डिसेंबर 2023 पासून उपलब्ध आहे. मात्र, या योजनेचा लाभ कधीपर्यंत घेता येणार याबाबत वेबसाईटवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

टॅग्स :रिलायन्स जिओ