Join us

७४९ रुपयांमध्ये २ वर्षांसाठी Amazon Prime आणि बरंच काही, Reliance Jio नं आणला जबरदस्त प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:41 IST

Reliance Jio News: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लान आणत असते, ज्यात अनेक फायदेही मिळतात.

Reliance Jio News: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लान आणत असते, ज्यात अनेक फायदेही मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यासोबत रिलायन्स जिओ युजर्सला १ किंवा २ महिने नाही तर संपूर्ण २ वर्षांसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा फायदा देत आहे.

या जिओ प्लानची किंमत फक्त ७४९ रुपये आहे, हा प्लान केवळ ओटीटी बेनिफिट्सच नाही तर डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सारख्या फीचर्ससह येतो. या जिओ रिचार्ज प्लानला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा ६९९ रुपयांचा प्लानही येतो.

प्लानमध्ये काय विशेष?

७४९ रुपयांच्या या जिओ पोस्टपेड प्लानमध्ये तुम्हाला १०० जीबी हायस्पीड डेटाचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय प्लानमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसही मिळतील. एवढंच नाही तर हा एक फॅमिली प्लान आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी स्वतंत्रपणे ३ सिम देखील मिळवू शकता आणि प्रत्येक सिमवर कंपनीकडून ५ जीबी अतिरिक्त डेटा दिला जाईल.

एक्स्ट्रा बेनिफिट्सबद्दल बोलायचं झालं तर हा प्लान केवळ अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच नाही तर नेटफ्लिक्स बेसिकचा फ्री अॅक्सेसदेखील देतो. रिलायन्स जिओच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन प्राईम लाइट सब्सक्रिप्शन दोन वर्षांसाठी वैध असेल. विशेष म्हणजे फॅमिली सिमसाठी दरमहा १५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे.

एअरटेलचा ६९९ प्लान

६९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये १०५ जीबी हायस्पीड डेटा, फ्री कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतील. या प्लानसोबत तुम्ही २ अतिरिक्त सिमही घेऊ शकता, एक्स्ट्रा बेनिफिट्सबद्दल बोलायचं झालं तर हा प्लान ६ महिन्यांसाठी अॅमेझॉन प्राइम मोबाइल सब्सक्रिप्शन देतो.

६९९ रुपयांच्या या प्लानसोबत केवळ अॅमेझॉनच नाही तर एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियम आणि डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाइलचं सब्सक्रिप्शन १ वर्षासाठी मिळणार आहे. कंपनी पोस्टपेड युझर्सना मोफत हॅलो ट्यून व्यतिरिक्त व्हीआयपी सेवा देखील देते. या दोन्ही प्लान्समध्ये तुम्हाला अतिरिक्त जीएसटी भरावा लागणार आहे.

टॅग्स :रिलायन्स जिओएअरटेल