Join us  

₹2500 वरुन ₹265 वर आला हा शेअर; आता गुंतवणूकदार तुटून पडले, भाव आणखी वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 6:13 PM

Reliance Infrastructure Share: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये असलेली तेजी कायम आहे.

Reliance Infrastructure Share: उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी गुडन्यूज आहे. त्यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये वाढीचा कल आजही कायम दिसला. गुरुवारी, कंपनीचा शेअर 8% ने वाढला आणि 268.45 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. मे 2023 मध्ये हा शेअर 131.40 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

आठवडाभरापासून तेजी आठवडाभरापासून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ होत आहे. या कालावधीत शेअरने 26 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, तीन महिन्यांतील परतावा सुमारे 40 टक्के आहे. दरम्यान, रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स त्याच्या उच्चांकावरुन 99 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. जानेवारी 2008 मध्ये रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 2510.35 रुपयांवर होते. मात्र, गेल्या 4 वर्षांत रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मार्च 2020 मध्ये कंपनीचे शेअर्स 10 रुपयांवर होते, जे मार्च 2024 मध्ये तो 265 रुपयांवर पोहोचले.

आता का वाढत आहे?अलीकडेच कंपनीने ICICI बँकेसोबत करार केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मते, त्यांनी 14 मार्च 2024 रोजी ICICI बँकेसोबत रिलायन्स पॉवरचा करार केला आहे. ICICI बँकेकडे कंपनीमध्ये 211 इक्विटी शेअर्स असून, ते संबंधित पार्टी किंवा प्रमोटर गटाचा भाग नाहीत. दरम्यान, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर वीज, रस्ते, मेट्रो रेल्वे आणि इतर पायाभूत क्षेत्रांसाठी अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे.

(टीप-शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :अनिल अंबानीशेअर बाजारव्यवसायशेअर बाजाररिलायन्स