Join us  

अदानी, अंबानी एकत्र येणार, प्रोजेक्टसाठी ५० कोटींची गुंतवणूक करणार मुकेश अंबानींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:58 PM

गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी पॉवर सेक्टरमधील एका मोठ्या प्रकल्पात एकत्र एन्ट्री केली आहे. जाणून घ्या कोणता आहे हा प्रकल्प.

Adani Power Reliance Mukesh Ambani : गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी पॉवर सेक्टरमधील एका मोठ्या प्रकल्पात एकत्र एन्ट्री केली आहे. दरम्यान, अदानी समूहाची कंपनी, अदानी पॉवर लिमिटेडने रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत ५०० मेगावॅटसाठी २० वर्षांचा दीर्घकालीन वीज खरेदी करार (PPA) केला आहे. हा करार कॅप्टिव्ह यूजर्स पॉलिसी अंतर्गत करण्यात आलाय. हे धोरण विद्युत नियम २००५ अंतर्गत आणण्यात आलं होतं. 

काय म्हटलं अदानी पॉवरनं? 

कंपनीची उपकंपनी महान एनर्जेनं (MEL) या करारावर स्वाक्षरी केली आहे. एमईएलची एकूण परिचालन क्षमता २,८०० MW आहे. यापैकी ६०० मेगावॅटच्या एका युनिटला कॅप्टिव्ह युनिट बनवण्याचा प्रस्ताव असल्याचं अदानी पॉवरनं मुंबई शेअर बाजाराला सांगितलं. 

रिलायन्सचा हिस्सा किती? 

अदानी पॉवरच्या म्हणण्यानुसार, कॅप्टिव्ह पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी, रिलायन्स इंडस्ट्रीजला पॉवर प्लांटच्या एकूण क्षमतेच्या प्रमाणात कॅप्टिव्ह युनिटमध्ये २६ टक्के हिस्सा ठेवावा लागेल. हे कॅप्टिव्ह युनिटच्या एकूण क्षमतेच्या प्रमाणात असेल. अदानी पॉवरनं सांगितले की, रिलायन्स एमईएलच्या ५ कोटी इक्विटी शेअर्सद्वारे यासाठी ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या कराराद्वारे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ५०० मेगावॅट वीज खरेदीसाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. या संदर्भात अदानी पॉवर, महान एनर्जेन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी गुंतवणूक करार केला आहे. 

सरकारी कंपनीला ऑर्डर 

सरकारी इंजिनिअरिंग कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला (BHEL) एक मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला अदानी पॉवरकडून ही ऑर्डर मिळाल्याची माहिती समोर आलीये. छत्तीसगडमधील रायगढ येथे १,६०० मेगावॅटचा रायगड स्टेज-२ थर्मल पॉवर प्लांट उभारण्यासाठी कंपनीला अदानी पॉवर लिमिटेडकडून ४,००० कोटी रुपयांची ऑर्डर मिळालीये. बीएचईएलनं स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये यासंदर्भातील माहिती दिली. छत्तीसगडमधील रायगढ फेज-2 येथे अति महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर आधारित २x८०० MW क्षमतेच्या प्रकल्पासाठी उपकरणांचा पुरवठा, बांधकाम आणि ऑपरेशनचे पर्यवेक्षण यासाठी २७ मार्च २०२४ रोजी ऑर्डर मिळाली असल्याचं यात नमूद करण्यात आलंय.

टॅग्स :गौतम अदानीरिलायन्सअदानीमुकेश अंबानी