Join us  

मुकेश अंबानी यांची Reliance अमेरिकेच्या कंपनीत करणार ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 1:14 PM

RNSEL अमेरिका स्थित एनर्जी स्टोरेज कंपनी Ambri मध्ये रिलायन्स करणार ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक.

ठळक मुद्देRNSEL अमेरिका स्थित एनर्जी स्टोरेज कंपनी Ambri मध्ये रिलायन्स करणार ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक.बिल गेट्सही कंपनीत करणार गुंतवणूक

रिलायन्स न्यू एनर्जी सोलार (Reliance New Energy Solar), पॉल्सन अँड कंपनी (Paulson and Company) आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे अमेरिकेतील कंपनी Ambri मध्ये एकूण १४.४ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. Reliance New Energy Solar (RNSEL) अमेरिका स्थिती एनर्जी स्टोरेज कंपनी Ambri मध्ये ५ कोटी डॉलर्स गुंतवेल. रिलायन्स या कंपनीचे ४.२३ कोटी शेअर्स खरेदी करणार आहे. या गुंतवणूकीमुळे कंपनी आपल्या लाँग ड्युरेशन एनर्जी स्टोरेज सिस्टमला जागतिक पातळीवर विकसित आणि कमर्शिअलाईज करण्यासाठी मदत मिळणार असल्याचं Ambri नं सांगितलं. 

Ambri सोबत भारतात एक मोठी बॅटरी तयार करणारा प्रकल्प उभारण्यासाठी चर्चा सुरू आहे, अशी माहिती Reliance New Energy Solar (RNSEL) कडून देण्यात आली. यापूर्वी २४ जून २०२१ रोजी ४४ व्या सर्वसाधारण सभेत बोलताना रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी कंपनी आपल्या  environment-friendly initiatives अंतर्गत ३ गीगा फॅक्टरी उभारणार असल्याचंही म्हटलं होतं. २०२१ मध्ये कंपनीची NEW ENERGY BIZ लाँच करण्याची योजना आहे. यामध्ये RIL ची लीडरशीप असेल. या योजने अंतर्गत Dhirubhai Ambani Green Energy GigaComplex ची स्थापना करण्यात येणार आहे.  Green Energy GigaComplex मध्ये चार फॅक्टरी असतील असंही अंबानी म्हणाले होते.

सुट्या भागांचं उत्पादनही गीगा फॅक्ट्री न्यू एनर्जी इको सिस्टमशी संबंधित सर्व महत्त्वाच्या भागांचं उत्पादन आणि त्यांचं इंटिग्रेशन करणार आहे. आपल्या ग्रीन इनिशिएटिव्ह अंतर्गत कंपनी ६० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याचंही अंबानी यांनी सांगितलं होतं. याशिवाय कंपनी आपल्या ग्रीन इनिशिएटिव्हच्या व्हॅल्यू चेनच्या विकासाशी संबंधित पार्टनरशिप आणि फ्युचर टेक्नॉलॉजीवर १५ हजार कोटी रूपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीबिल गेटसअमेरिकागुंतवणूकभारतधीरुभाई अंबानी