Join us  

Reliance, Samsung: कोरोना काळात कोणत्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली; यादी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 3:55 PM

CoronaVirus Reliance mukesh Ambani took care of employees more: बिझनेस मॅगझीन फोर्ब्सने (Forbes) जगातील बेस्ट एम्प्लॉयर लिस्ट जारी केली आहे. या कंपन्यांमध्ये भारतातील एकूण 19 कंपन्यांना स्थान मिळाले आहे.

बिझनेस मॅगझीन फोर्ब्सने (Forbes) जगातील बेस्ट एम्प्लॉयर लिस्ट जारी केली आहे. फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर 2021 च्या यादीत मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स इंडस्ट्रीने (Reliance Industries) भारतातून पहिले स्थान पटकावले आहे. जगाच्या यादीत रिलायन्स 52 व्या क्रमांकावर आहे. 

या यादीमध्ये जगभरातील 750 मोठ्या कंपन्याचा समावेश आहे. यामध्ये भारतातील एकूण 19 कंपन्यांना स्थान मिळाले आहे. रिलायन्सशिवाय आयसीआयसीआय बँक (65), एचडीएफसी बँक (77), एचसीएल टेक्नॉलॉजी (90) यांचा समावेश आहे. जगात एक नंबरला सॅमसंगने (Samsung) बाजी मारली आहे. दुसरा ते सातवा क्रमांक अमेरिकी कंपन्यांनी पटकावला आहे. आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, अॅप्पल, अल्फाबेट आणि डेलचा समावेश आहे. 8 व्या क्रमांकावर चीनची एकमेव कंपनी हुवावे आहे. 9 व्या नंबरवर अॅडॉब ही कंपनी तर दहाव्या क्रमांकावर बीएमडब्ल्यू आहे. 

भारतातील सर्वाधिक बाजारमुल्य असलेली कंपनी रिलायन्सने कोरोना काळात मोठमोठ्या संधी साधल्या आहेत. एकीकडे उद्योग ठप्प झालेले असताना रिलायन्सने आपल्या कर्माचाऱ्यांच्या पगाराता कपात केली नाही. यामुळे कर्मचारी चिंतामुक्त होऊन काम करू शकले. दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह त्य़ांच्या आरोग्याची काळजी कंपनीने घेतली. तसेच लसीकरणही केले. तसेच जे कर्मचारी कोरोनामुळे मृत झाले त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक मदतही केली. 

स्टेटिस्टासोबत मिळून फोर्ब्सने हा सर्व्हे केला आहे. यामध्ये 58 देशांच्या जवळपास 150000 कर्मचाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. 

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीएचडीएफसीसॅमसंग