Join us
Daily Top 2Weekly Top 5

₹८५ वरुन आपटून ₹२ वर आलेला 'हा' शेअर; आता लागलं अपर सर्किट, चर्चेत आहे कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:15 IST

पाहा कोणता आहे हा शेअर, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Reliance Home Finance share: अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय. असाच एक शेअर म्हणजे 'रिलायंस होम फायनान्स'चा आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरच्या किमतीत ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आणि तो २.७५ रुपयांच्या मागील क्लोजिंगच्या तुलनेत २.८८ रुपयांवर पोहोचला. जून २०२५ मध्ये हा शेअर ७.८४ रुपयांपर्यंत गेला होता, जो या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. मात्र, शेअरच्या 'ऑल टाइम हाय'चा विचार केला तर तो ८५ रुपयांपेक्षा जास्त राहिला आहे.

कंपनी का आहे चर्चेत?

गेल्या काही महिन्यांपासून 'रिलायंस होम फायनान्स लिमिटेड' चर्चेत आहे. वास्तविक, नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयानं अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोल अंबानी यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. रिलायंस होम फायनान्सचं बँक खातं 'फसवणूक' (fraudulent) घोषित करण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायालयानं या याचिकेवर नोटीस जारी केली असून २७ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

ट्रम्प यांच्या ट्रेड डीलमध्ये भारताला किती धोका? ११० अब्ज डॉलर्सचे व्यवहार धोक्यात; चीनही संतापला

सीबीआयनं कंपनीविरुद्ध नोंदवला होता गुन्हा

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) युनियन बँक ऑफ इंडियासोबत (पूर्वीची आंध्र बँक) कथित फसवणूक केल्याप्रकरणी जय अनमोल अंबानी आणि रिलायंस होम फायनान्सविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे सुमारे २२८ कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं.

बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने रिलायंस होम फायनान्स, जय अनमोल अंबानी आणि कंपनीचे संचालक रवींद्र शरद सुधाकर यांच्याविरुद्ध कारवाई केली. तक्रारीत नमूद केल्यानुसार, कंपनीनं व्यावसायिक गरजांसाठी मुंबईस्थित बँकेच्या एससीएफ शाखेकडून ४५० कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी कर्जाचे हप्ते भरण्यात अपयशी ठरली आणि त्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ रोजी संबंधित खातं एनपीए म्हणून घोषित करण्यात आलं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Reliance Home Finance Share Rises After Plunging, Company in News

Web Summary : Reliance Home Finance share price saw an upper circuit after falling from ₹85 to ₹2. The company is in the news due to a court case involving Union Bank of India and CBI investigation into alleged fraud. Jai Anmol Ambani's involvement is also highlighted.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक