Join us

RIL, Viacom18 & Disney Merger : अखेर Reliance-Disney ची विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण; नीता अंबानींवर अध्यक्षपदाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 22:28 IST

RIL, Viacom18 & Disney Merger : या संयुक्त उपक्रमाचा पूर्ण कंट्रोल रिलायन्स इंडस्ट्रीजकडे असेल.

Reliance-Disney : बहुचर्चित रिलायन्स आणि डिस्नेचे मर्जर आज अखेर पूर्ण झाले. या मर्जरनंतर 70,352 कोटी रुपयांचा नवीन संयुक्त उपक्रम अस्तित्वात आला आहे. दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त निवेदनानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने या उपक्रमात 11,500 कोटी रुपये ($1.4 अब्ज) गुंतवले आहेत. या संयुक्त उपक्रमाच्या अध्यक्षपदी नीता अंबानी यांची निवड झाली आहे. 

करार पूर्ण झाल्यानंतर संयुक्त उपक्रमाचे नियंत्रण रिलायन्स इंडस्ट्रीजकडे राहील. या उपक्रमात रिलायन्स इंडस्ट्रीजची 16.34 टक्के भागीदारी आहे, तर तिची उपकंपनी व्हायाकॉम 18 ची 46.82 टक्के भागादारी असेल. तर, डिस्ने कंपनीकडे उर्वरित 36.84 टक्के हिस्सा असेल. नीता अंबानी या संयुक्त उपक्रमाच्या अध्यक्ष असतील, तर उदय शंकर यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. 

CCI आणि NCLT कडून आधीच मिळालेली मंजुरीViacom 18 मीडिया आणि वॉल्ट डिस्ने यांना भारतीय स्पर्धा आयोग (CCI), नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) सारख्या प्राधिकरणांकडून Viacom 18 च्या मीडिया आणि JioCinema व्यवसायाच्या Star India मध्ये विलीनीकरणासाठी आधीच मंजुरी मिळाली होती. मार्च 2024 ला संपणाऱ्या आर्थिक वर्षात (2023-24) सुमारे 26,000 कोटी रुपये ($3.1 अब्ज) च्या एकूण कमाईसह हा संयुक्त उपक्रम भारतातील सर्वात मोठ्या मीडिया कंपन्यांपैकी एक आहे.

संयुक्त उपक्रमात 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल या संयुक्त उपक्रमात 100 हून अधिक टीव्ही चॅनेल असून, ते दरवर्षी 30,000 तासांहून अधिक टीव्ही मनोरंजन कंटेट तयार करतात. JioCinema आणि Hotstar डिजिटल प्लॅटफॉर्मचा एकूण युजरबेस 5 कोटींहून अधिक आहे. या संयुक्त उपक्रमाकडे क्रिकेट, फुटबॉल आणि इतर खेळांमधील हक्कांचाही पोर्टफोलिओ आहे.

 

टॅग्स :रिलायन्सगुंतवणूकव्यवसाय