Join us  

रिलायन्सही उतरली शर्यतीत; आजपासून 'डिजिटल इंडिया सेल' सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 1:22 PM

11 ते 15 ऑगस्टपर्यंत सर्व बँकांच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डवर 10 टक्क्यांची तत्काळ सूट

मुंबई : देशभरात सध्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीचे वातावरण असून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर महासेल सुरु झाला आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्टनंतर आता इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन विक्रीमध्ये नंबर 1 ला असणाऱ्या रिलायन्स डिजिटलनेही  11 ते 15 ऑगस्टपर्यंत 'डिजिटल इंडिया सेल' जाहीर केला आहे. 

 या सेलमध्ये ग्राहकांना सर्व बँकांच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डवर 10 टक्क्यांची तत्काळ सुट मिळणार आहे. यामध्ये अमेरिकन एक्स्प्रेस, सीटी बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या कार्डचा समावेश आहे. सर्व बँकांशी टायअप केलेले रिलायन्स डिजिटल हे एकमेव स्टोअर आहे. ही सूट देशभरातील 800 शहरांमध्ये असलेल्या रिलायन्स डिजिटल आणि माय जियोच्या दालनांमध्ये मिळणार असल्याचे रिलायन्स डिजिटलकडून सांगण्यात आले आहे.  

 या महासेलमध्ये एचडी एलईडी टीव्हीची रेंज 10,999 पासून, लॅपटॉप, प्रिंटर, साऊंडबार, फ्रिज यांची रेंज 11,490 पासुन ठेवण्यात आली आहे. याचबरोबर वॉशिंग मशीन 10,490 पासून, मोबाईल आणि इतर अॅक्सेसरीजवरही मोठी सूट मिळणार आहे. तसेच रेसक्यू द्वारे ग्राहकांना मोफत डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशन देण्यात येणार आहे. रिलायन्स डिजिटलमध्ये 4000 हून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. यामध्ये 200 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि भारतीय ब्रँडचा समावेश याहे. 

टॅग्स :रिलायन्सरिलायन्स जिओ