Rekha Jhunjhunwala Portfolio Stock: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील सर्वात मोठा शेअर मानल्या जाणाऱ्या 'टायटन कंपनी'बाबत ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसने मोठा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेजच्या मते, भविष्यात कंपनीच्या नफ्यात वाढ होऊ शकते आणि शेअरच्या व्हॅल्यूएशन रेटिंगमध्येही सुधारणा पाहायला मिळू शकते. मार्च तिमाहीत कंपनीच्या वाढीचा वेग डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत अधिक असल्याचं एमके ग्लोबलनं म्हटलंय. टायटनचा शेअर शनिवारी ४,०७२ रुपयांवर बंद झाला.
ब्रोकरेजचं मत आणि वाढीची कारणं
डिसेंबर तिमाहीत कंपनीची वाढ सुमारे ४० टक्के होती, मात्र मार्च तिमाहीत यात अधिक तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत. या वाढीमागे 'स्टडेड ज्वेलरी'ची उत्तम विक्री, प्रॉडक्ट मिक्समधील सुधारणा, गोल्ड एक्स्चेंज प्रोग्राम आणि सेलिब्रिटी प्रमोशन यांसारखी कारणं असल्याचं ब्रोकरेजनं म्हटलं आहे. तसेच, आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ग्राहकांचा विश्वास वाढल्यानं खरेदीतही वेग आला आहे.
टार्गेट प्राईस आणि झुनझुनवाला यांची भागीदारी
एमके ग्लोबलने टाटा ग्रुपच्या या कंपनीसाठी ५,००० रुपये इतकी टार्गेट प्राईस दिली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार (सुमारे ४,०७२ रुपये) या शेअरमध्ये जवळपास २३ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज आहे. डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस रेखा झुनझुनवाला यांची टायटनमध्ये ५.३१ टक्के भागीदारी होती, जी ४,७१,८४,४७० शेअर्स इतकी आहे. गुरुवारच्या मार्केट कॅपिटलायझेशननुसार त्यांच्या या हिश्श्याची किंमत १९,००० कोटी रुपयांहून अधिक आहे. गेल्या एका वर्षात टायटनच्या शेअरमध्ये सुमारे ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ज्वेलरी सेगमेंटमधील आव्हानं
सोन्याच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि ग्राहकांकडून काही काळासाठी असलेली कमी मागणी यामुळे १ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ज्वेलरी सेगमेंटमध्ये कंपनीला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. असं असलं तरी, इतर विभागांमध्ये, विशेषतः स्टडेड ज्वेलरीमध्ये ग्राहकांची संख्या सातत्यानं वाढत आहे. कमी बजेट असलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी आता हलक्या वजनाच्या आणि कमी कॅरेटच्या दागिन्यांच्या डिझाइनवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Brokerage firm MK Global predicts Titan's profit growth, valuing shares at ₹5,000, a 23% increase. Rekha Jhunjhunwala holds 5.31% stake, worth ₹19,000 crore. Despite jewelry segment challenges, studded jewelry sales are rising.
Web Summary : ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबल ने टाइटन के मुनाफे में वृद्धि का अनुमान लगाया है, शेयर का मूल्य ₹5,000 आंका है, जो 23% की वृद्धि है। रेखा झुनझुनवाला के पास 5.31% हिस्सेदारी है, जिसकी कीमत ₹19,000 करोड़ है। ज्वेलरी सेगमेंट में चुनौतियों के बावजूद, स्टडेड ज्वेलरी की बिक्री बढ़ रही है।