रेटिटवर एक पोस्ट सध्या वेगानं व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एका अशा व्यक्तीची कहाणी सांगितली आहे ज्यानं आरामात ४.७ कोटी रुपयांची संपत्ती तयार केली. वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी ही कमाई केली आणि निवृत्तीही घेतली. विशेष म्हणजे त्याच्याकडे फार मोठ्या पगाराची नोकरी नव्हती किंवा त्या व्यक्तीनं कोणताही साइड बिझनेसही केला नव्हता.
ही पोस्ट रेडिट युजर CAGRGuyनं शेअर केली आहे. आपल्या काकांनी वयाच्या ४५ व्या वर्षी ४.७ कोटी रुपयांची संपत्ती गोळा केली. त्यांची जीवनशैली अतिशय साधी होती. ३० वर्षांपासून ते याच टू बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. ते स्कूटर चालवत असत आणि क्वचितच सुट्टीवर जात असत. त्यांनी कधी व्यवसाय सुरू केला नाही, शेअर बाजारात पैसे गुंतवले नाहीत किंवा पैशांचा दिखावाही केला नाही. स्थिर, नियमित नोकरीतूनच त्यांचं उत्पन्न होतं, असं या युजरनं म्हटलंय.
सरकार ई-ट्रकसाठी देणार ९ लाखांपेक्षा अधिक सब्सिडी; जाणून घ्या कसा होणार फायदा?कशी बनवली इतकी संपत्ती?
त्यांना बचत आणि गुंतवणुकीची सवय असल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय. १९९८ मध्ये त्यांनी म्युच्युअल फंडात १० हजार रुपये गुंतवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ५०० रुपयांची एसआयपी सुरू केली. एसआयपी हा एक प्रकारचा हप्ता आहे जो दर महिन्याला आपल्या बँक खात्यातून कापला जातो आणि म्युच्युअल फंडात जमा केला जातो. पगार वाढल्यानं त्यांनी एसआयपीची रक्कमही वाढवली. आधी १००० रुपये, नंतर २००० रुपये आणि नंतर ५००० रुपये.
"वयाच्या ४५ व्या वर्षी जेव्हा ते निवृत्त झाले, तेव्हा मी त्यांना विचारलं की त्यांनी हे सगळं कसं केलं? त्यांनी मला त्यांचं पासबुक आणि CAMS मधून छापलेला पेपर दिला. त्यांची एकूण संपत्ती ४.७ कोटी रुपये होती," असं त्यानं नमूद केलंय. मधून ही म्युच्युअल फंडांच्या नोंदी ठेवणारी कंपनी आहे.
पोस्ट झाली व्हायरल
ही पोस्ट लगेचच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. यावर अनेकांच्या कमेंट्स आणि लाईक्सही आले. काही युजर्सनी त्यांच्या शिस्तीचं आणि दीर्घकालीन विचारसरणीचं कौतुक केलं. साध्या सवयींमुळे मोठे परिणाम कसे मिळू शकतात याचं हे खरं उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटलं. दरम्यान, काही लोकांनी, त्यांनी चांगली बचत केली असली तरी त्यांनी त्यांच्या तारुण्यात जीवनाचा पूर्ण आनंद घेतला नसेल, असंही म्हटलं.