Join us  

संरक्षण मंत्रालयाकडून मिळाली ₹1070 कोटींची ऑर्डर, शिपिंग कंपनीचा शेअर बनला रॉकेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 7:30 PM

संरक्षण मंत्रालयाने Mazagon डॉकसोबत 1070.47 कोटी रुपयांचा करार केला आहे.

मझगाव डॉक शिपबिल्डर्सचा (Mazagon Dock Shipbuilders) शेअर गुरुवारी 6% हून अधिकने वाढून ₹2475 वर पोहोचला आहे. खरे तर संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या एका मोठ्या आदेशामुळे शिपिंग कंपनीच्या शेअरमध्ये ही वृद्धी झाली आहे. संरक्षण मंत्रालयाने Mazagon डॉकसोबत 1070.47 कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारांतर्गत संरक्षण मंत्रालय कंपनीकडून भारतीय तटरक्षक दलासाठी 14 प्रगत जलद गस्त जहाजे खरेदी करणार आहे. 

3 वर्षांत 1000% हून अधिकची तेजी -मझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअरमध्ये गेल्या 3 वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. 29 जानेवारी 2021 रोजी कंपनीचा शेअर 210.90 रुपयांवर होते. 25 जानेवारी 2024 रोजी तो 2475 रुपयांवर पोहोचला. गेल्या 3 वर्षांत माझगाव डॉकचा शेअर 1030% ने वाढला आहे.

गेल्या एका वर्षात, या शेअरमध्ये 225% हून अदिकची वृद्धी दिसून आली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचा शेअर 738.35 रुपयांवरून 2475 रुपयांपर्यंत वाढला. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2490 रुपये आहे. तर, नीचांकी 612.80 रुपये एवढा आहे.

63 महिन्यांच्या आत जलद गस्त जहाजे देईल कंपनी -माझगाव डॉक शिपबिल्डर्स ही जलद गस्त जहाजे अथवा फास्ट पेट्रोल व्हेसल्स (FPV) तयार करेल. ही जलद गस्त जहाजे 63 महिन्यांच्या आत पोहोचविली जाणार आहेत. ही जहाजे बहुउद्देशीय ड्रोन, वायरलेस नियंत्रित रिमोट वॉटर रेस्क्यू क्राफ्ट लाइफबॉय आणि आर्टिफिशल इंटॅलिजन्सने सुसज्ज असतील. ही जहाजे फिशरीज प्रोटेक्शन अँड मॉनिटरिंग, कंट्रोल अँड सर्व्हेलन्स, खोल पाण्यात शोध आणि बचाव कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकसंरक्षण विभागभारतीय नौदल