Join us
Daily Top 2Weekly Top 5

५५५% नं वाढला बँकेचा नफा; तरीही शेअर्सची स्थिती वाईट; ९% नं आपटला 'हा' स्टॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:20 IST

बँकेला नफा होऊनही का झाली शेअर्समध्ये मोठी घसरण. तुमच्याकडे आहे का हा शेअर?

RBL Bank Stock Price: खाजगी क्षेत्रातील आरबीएल (RBL) बँकेचे शेअर्स सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरले. आरबीएल बँकेचे शेअर्स बीएसईवर (BSE) ९ टक्क्यांनी घसरून २९७.४० रुपयांवर पोहोचलेत. डिसेंबर २०२५ च्या तिमाहीचे उत्कृष्ट निकाल लागूनही बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आरबीएल बँकेचा नफा वार्षिक आधारावर ५५५ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका वर्षात या खाजगी बँकेच्या शेअर्समध्ये ८७ टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे.

बँकेचा तिमाही नफा ५५५ टक्क्यांनी वाढला

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत आरबीएल बँकेचा नफा वार्षिक आधारावर ५५५ टक्क्यांनी वाढून २१४ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेचा नफा ३३ कोटी रुपये होता. त्याच वेळी, तिमाही आधारावर बँकेच्या नफ्यात २० टक्क्यांची वाढ झाली. गेल्या एका वर्षातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, २० जानेवारी २०२५ रोजी बँकेचे शेअर्स १५८.५० रुपयांवर होते. १९ जानेवारी २०२६ रोजी आरबीएल बँकेचे शेअर्स २९७.४० रुपयांवर व्यवहार करत आहेत. बँकेच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ३३१.८० रुपये आहे, तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १४६ रुपये आहे.

पैसा येणार कसा, कुठून अन् किती; तुम्ही तुमचं 'बजेट' कधी तयार केलंय का?

बँकेचं व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न वाढलं

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत आरबीएल बँकेचं व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न ५ टक्क्यांनी वाढून १६५७ कोटी रुपये झालं. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत हे उत्पन्न १५८५ कोटी रुपये होतं. आरबीएल बँकेचं 'नेट इंटरेस्ट मार्जिन' (NIM) ४.६३ टक्के राहिलं, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा ३३ बेसिस पॉइंट्सने कमी आहे. डिसेंबर २०२५ च्या तिमाहीत बँकेच्या 'ॲसेट क्वालिटी'मध्ये सुधारणा झाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचा ग्रॉस एनपीए (Gross NPA) प्रमाण घटून १.८८ टक्क्यांवर आला आहे, जो सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीअखेर २.३२ टक्के होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : RBL Bank Profit Soars, Stock Plummets: Shares Drop by 9%

Web Summary : Despite a 555% profit surge, RBL Bank shares plunged 9% due to a fall in net interest margin. The bank's net profit for the December quarter rose to ₹214 crore. Gross NPA improved to 1.88%.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक