Join us

एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 13:16 IST

नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने एचडीएफसी बँकेला ४.८८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच एनबीएफसी श्रीराम फायनान्स लिमिटेडला २.७० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेनेएचडीएफसीबँक आणि श्रीराम फायनान्सवर मोठी कारवाई केली. ही कारवाई नियमांचे उल्लंघन केल्यामुळे केल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते. जेव्हा जेव्हा एखादी बँक नियमांचे उल्लंघन करते आणि मनमानी पद्धतीने काम करते तेव्हा RBI त्यावर दंड आकारू शकते. या संदर्भात, RBI ने नियमांचे पालन न केल्याबद्दल या बँकांवर कारवाई केली. खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेला 4.88 लाख रुपये आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी श्रीराम फायनान्स लिमिटेडला 2.70 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?

ग्राहकांना कर्ज देताना एचडीएफसी बँकेने भारतातील परकीय गुंतवणुकीशी संबंधित काही नियमांचे उल्लंघन केल्याचे आरबीआयला आढळले. यासाठी बँकेला 'कारणे दाखवा नोटीस' बजावण्यात आली. बँकेने लेखी आणि तोंडी आपली बाजू मांडली, परंतु केंद्रीय बँकेने चौकशीनंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. यानंतर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला.

श्रीराम फायनान्सवरही कारवाई

श्रीराम फायनान्सवर 'आरबीआय निर्देश, २०२५' च्या काही नियमांचे पालन न केल्याचा आरोप होता. ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या आर्थिक स्थितीची तपासणी केल्यानंतर,  'कंपनीने कर्जाची रक्कम थेट तिच्या खात्यात जमा केली, परंतु पेमेंट तृतीय पक्षाच्या खात्याद्वारे केले गेले, असं आरबीआयला असे आढळून आले. कंपनीला नोटीस बजावण्यात आली आणि उत्तर मागितण्यात आले. श्रीराम फायनान्सचे उत्तर आणि सुनावणीनंतर, मध्यवर्ती बँकेने दंड आकारण्याचा निर्णय घेतला.

भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई केवळ नियमांचे उल्लंघन केल्याच्या आधारे करण्यात आली आहे. याचा कर्ज कराराच्या वैधतेवर किंवा ग्राहकांसोबतच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही.

टॅग्स :एचडीएफसीबँक