Join us

RBIने केली Amazonवर मोठी कारवाई; ठोठावला ३.०६ कोटीचा दंड, नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 13:48 IST

RBI Action On Amazon: रिझर्व्ह बँकेने अ‍ॅमेझॉन कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

RBI Action On Amazon:भारतीय रिझर्व्ह बँकेने नियम उल्लंघनाबाबत कठोर पावले उचलत असल्याचे दिसत आहे. सहकारी, खासगी तसेच सार्वजनिक बँकांवर रिझर्व्ह बँक कारवाईचा बडगा उगारत मोठ्या रकमेचा दंड ठोठावत असल्याचे दिसत आहे. यातच आता ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या अ‍ॅमेझॉन कंपनीवर रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई करत कोट्यवधींचा दंड ठोठावल्याची माहिती देण्यात आली आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेनेअ‍ॅमेझॉन पे (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनावर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने कंपनीवर ३.०६ कोटी रुपयांहून अधिक दंड आकारला आहे. हा दंड प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट्स (PPI) आणि केव्हायसी (KYC) संबंधित काही तरतुदींचे पालन केले गेले नसल्याच्या कारणावरून ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने या कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. काही नियमांचे पालन न करण्याबाबत कंपनीला दंड का ठोठावला जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली होती. 

नियमांचे पालन करण्यात कसूर करण्यात आल्याने दंड

कंपनीचे उत्तर आल्यानंतर शेवटी आरबीआयने कंपनीला दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हा दंड नियमांचे पालन करण्यात कसूर करण्यात आल्याने लावण्यात आला असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. अ‍ॅमेझॉन पेने (इंडिया) आपल्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही देवाणघेवाण किंवा करारावर टिप्पणी करणे असा नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, देशात यूपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये फोन पे, गूगल पे आणि पेटीएमचा दबदबा आहे. NPCI च्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात देशात एकूण बाजारात त्यांची भागीदारी ९६ टक्के इतकी होती. यात सर्वात मोठी हिस्सेदारी फोनपेची आहे. फोनपेकडे सुमारे ५० टक्के बाजारात हिस्सेदारी आहे. यानंतर गूगल पेचा क्रमांक लागतो. गूगल पेकडे ३४.३४ टक्के बाजार हिस्सेदारी आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकअ‍ॅमेझॉन